धमक्यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, ‘सिकंदर’च्या शूटदरम्यान मिळणार चार स्तरीय सुरक्षा
जीवे मारण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या हैदराबादमध्ये सलमान खानच्या ‘सिकंदर’ सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. या शूटसाठी सलमानला चार स्तरीय सुरक्षा देण्यात आली आहे. महिनाभराच्या शेड्यूलमध्ये सलमान आणि रश्मिका मंदाना यांची दोन गाणी चित्रित केली जातील. त्यानंतर सलमान त्याच्या दा-बंग रीलोडेड शोसाठी दुबईला जाईल.
महिनाभराच्या शुटिंगच्या शेड्युलसाठी चार स्तरीय सुरक्षा देण्यात आली आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेला प्राधान्य देत चित्रपटाच्या युनिटकडूनही शुटिंगच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शुटिंग परिसरात केवळ चित्रपटाच्या युनिटलाच प्रवेश देण्यात आला आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानला सरकारी अधिकृत सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यात एनएसजी कमांडो आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानकडे चार-स्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. यामध्ये माजी निमलष्करी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय सलमानचा अंगरक्षक शेराने निवडलेली टीम आणि हैदराबाद पोलीस आणि मुंबई पोलिसही सुरक्षेसाठी तैनात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List