CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले…

CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्याचा आरोप शिंदे यांनी केला. एक दिवसापूर्वी मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीने योजनांचा पाऊस पाडला. महिला मतदारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी योजनांची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे. महाविकास आघाडी हे प्रिंटिंग मिस्टिकवाले असल्याचा टोला सुद्धा त्यांनी यावेळी हाणला.

महाविकास आघाडीला खुलं आव्हान

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दोन, सव्वा दोन वर्षाच्या कालावधीचा आढावा घेत, महाविकास आघाडीला खुलं आव्हान दिले आहे. आमचे गेल्या सव्वा दोन वर्षातील काम आणि महाविकास आघाडीचे अडीच वर्षातील काम समोर ठेवा. त्यांनी काय काय केले, काय निर्णय घेतला ते त्यांनी सांगावे. त्यांनी आमच्या किती कामात अडथळा आणला. खोडा घातला ते सांगावे, मी त्यांना खुलं आव्हान देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ते तर नकल बहाद्दर

आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. त्यांनी अगोदर विरोध केला. या योजनेविरोधात महाविकास आघाडीतील नेते हायकोर्टात गेले आणि आता तेच ही योजना पळवत आहेत. तेच आता आम्हाला फॉलो करत आहेत. आमच्या सर्व योजना टॉप आहेत. ते आता आमच्या सर्व योजना कॉपी करत आहेत. मतदार राजा हुशार आहे. त्यांना हा सर्व प्रकार कळत असल्याचा चिमटा मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढला.

आम्ही लाडक्या बहिणीप्रमाणेच लाडक्या शेतकरी बांधवांसाठी कर्ज माफी केली. आता महाविकास आघाडी आमच्या मागे मागे येत आहे. ते आमची कॉपी करत आहे. त्यांनी आमच्या योजनांची कॉपी केली आहे. लोकांना माहिती आहे, हे काहीच देणार नाहीत. ते प्रिंटिंग मिस्टेकवाले आहेत. राजस्थान, कर्नाटक, हिमाचलमध्ये त्यांनी योजना सुरु केल्या. पण पुढे त्यांच्याकडे पैसा उरला नाही. तेव्हा त्यांनी केंद्राकडे पैशांची मागणी केली.

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात आम्ही अगोदरच पैसे जमा केले. आम्ही डिसेंबरपर्यंतची तरतूद केली. योजनेचा हप्ता अगोदरच बहि‍णींच्या खात्यात जमा केला. आम्हाला आचारसंहिता लागणार हे माहिती होते. आमच्या बहि‍णी महाविकास आघाडीच्या या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. त्या आम्हाला निवडून देतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘एका महिन्यात मारून टाकणार…’, सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीकडून मोठा खुलासा ‘एका महिन्यात मारून टाकणार…’, सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीकडून मोठा खुलासा
Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी देणाऱ्या आणि 5 कोटी रुपये खंडनी मागणारा आरोपी बीखाराम बिष्णोई याला...
लग्नानंतर बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे मोडले संसार
प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने आजार दूर होतात; जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल
हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होतो? रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली? मग ‘हे’ उपाय नक्की करा 
चांगली झोप न झाल्यास होऊ शकतो ‘या’ आजाराचा धोका, कसा कराल उपचार? 
तळवडेतील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार – अजित गव्हाणे
झेडपीच्या सभागृहातून कोण जाणार विधानसभेत ?