Uddhav Thackeray : विधानसभेच्या रणांगणात उद्धव ठाकरे यांनी तोडली ही परंपरा; राज ठाकरे यांनी केलं होतं मन मोठं

Uddhav Thackeray : विधानसभेच्या रणांगणात उद्धव ठाकरे यांनी तोडली ही परंपरा; राज ठाकरे यांनी केलं होतं मन मोठं

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने अनेक जागांवर तोडगा शोधला आहे. आता अवघ्या काही जागांवर काथ्याकूट सुरू आहे. महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली आहे. तर काही जागांवर दिल्लीत चर्चा सुरू आहे. लवकरच सर्व काही आलबेल होण्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 65 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात त्यांनी ठाकरे कुटुंबातील एक परंपरा खंडीत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी विधानसभेच्या रणांगणात ही परंपरा जपली होती. आता विधानसभेच्या रणसंग्रामात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळणार आहे.

जागा वाटपात महायुतीची आघाडी

जागा वाटपात सत्ताधारी महायुतीने आघाडी घेतली. भारतीय जनता पक्षाने 99, एकनाथ शिंदे शिवसेना 45 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने 38 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. उर्वरीत जागांवर दिल्ली दरबारी खल सुरू आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात घमासान झाल्यानंतर यशस्वी तोडगा काढण्यात आला. उद्धव ठाकरे गटाने 65 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. या यादीत माहिम मतदारसंघावरून आता राजकारण वातावरण तापण्याची शक्यता आहे.

अमित ठाकरेंविरोधात उद्धव सेनेचा उमेदवार

पहिल्यांदा आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघात उभे राहिले, तेव्हा राज ठाकरे यांनी वरळी विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यांनी विना शर्त पाठिंबा दिला होता. ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना निवडणुकीच्या रिंगणात नको, ही परंपरा राज ठाकरे यांनी सुरू केली होती. त्यावेळी त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. पण यावेळी उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा खंडीत केल्याचा आरोप होत आहे.

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून माहिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर यांना तिकीट दिले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात महेश सावंत यांना उतरवले आहे. उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांनी यापूर्वी मन मोठं केल्याचे अनेकांनी सांगितले. अर्थात निवडणुकीत काही होऊ शकते. माहिममधील समीकरणं उद्धव सेनेच्या दृष्टीने वेगळेही असू शकतात. आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर ठाकरे कुटुंबातील दुसरा सदस्य पण थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. ठाकरे कुटुंबातून कोणीही निवडणुकीच्या मैदानात उतरले नव्हते. पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उडी घेतली. आता अमित ठाकरे माहिममधून नशीब आजमावत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हे सरकार 23 तारखेला बदलणार म्हणजे बदलणारच! आदित्य ठाकरे यांचा निर्धार हे सरकार 23 तारखेला बदलणार म्हणजे बदलणारच! आदित्य ठाकरे यांचा निर्धार
विदर्भातील शेतकरी असतील, मराठवाड्यातील शेतकरी असतील सर्व हैराण आहेत, त्रस्त आहेत. विचार करतायत हे सरकार कधी बदलणार, हे सरकार 23...
‘माझी विनंती, कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये’, गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले?
सत्तेत नसताना मनसेने रिझल्ट दिले, राज ठाकरे कळकळीने म्हणाले; एकदा संधी द्याच
सत्ता द्या 48 तासाच्या हातात सगळ्या मशिदीवरचे भोंगे काढून दाखवतो – राज ठाकरे
हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारं, आमदार कैलास पाटील यांची टीका
भाजपच्या नाराजीनंतरही अजितदादा मलिकांच्या प्रचारात आघाडीवर, म्हणाले कोणीही कितीही विरोध करू द्या तरीही..
पुन्हा पैशांचं घबाड, विरार आणि नालासोपाऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या रकमेसह 2 संशयास्पद व्हॅन सापडल्या, तपासाला वेग