लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद
गंदरबल आणि शोपियानमध्ये कामगारांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच आज जम्मू आणि कश्मीरच्या बारामुल्ला जिह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. यात दोनन जवान शहीद झाले तर दोन पोर्टर्सचाही मृत्यू झाला.
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादी हल्ले घटल्याचा केलेला दावा सातत्याने पह्ल ठरत आहे. दरम्यान, ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर लगेचच दुसऱया दिवशी जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आले आहे.
बारामुल्ला जिह्यातील गुलमर्गच्या नागीन भागात नियंत्रण रेषेजवळ 18 राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यात लष्कराचे 7 जवान जखमी झाले आहेत.
हल्ल्यात 3 हून अधिक दहशतवादी सहभागी
या हल्ल्यात 3 हून अधिक दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी बारामुल्ला परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे. उत्तर कश्मीरमधील बोटा पाथरी सेक्टरमध्ये एलओसीवरून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असावी असा अंदाज आहे.
गंदरबलमध्ये हल्ला करणाऱया दहशतवाद्याचे सीसीटीव्ही फुजेट समोर
गंदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान एका दहशतवाद्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हा दहशतवादी एके रायफल घेऊन जाताना दिसत आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्याची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. हे फुटेज हल्ल्यात सामील झालेल्या दहशतवाद्याचे असले तरी याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा दहशतवादी ज्याठिकाणी शिरताना दिसत आहे. हे ठिकाण गगनगीर बोगद्याच्या बांधकामाजवळ असल्याचे सांगितले जात आहे.
पुलवामा जिह्यात गोळीबारात मजूर जखमी
दक्षिण कश्मीरमधील पुलवामा जिह्यातील बटगुंड येथे आज सकाळी दहशतवाद्यांनी आणखी एका मजुरावर गोळीबार केला. या हल्ल्यात मजूर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शुभम कुमार (19) असे या जखमी मजुराचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. आणखी एका घटनेत श्रीनगरमधील गनबाग परिसरात एकागैर-कश्मिरी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. ही व्यक्ती बंगालची रहिवासी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरात गैर-कश्मिरींवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी दहशतवाद्यांनी 20 ऑक्टोबरला गंदरबल आणि 18 ऑक्टोबरला शोपियानमध्ये टार्गेट किलिंग केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List