सबकुछ मोदी आणि जमीन अदानी, असले मनसुबे पाताळात गाड़ून त्यावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू – उद्धव ठाकरे

सबकुछ मोदी आणि जमीन अदानी, असले मनसुबे पाताळात गाड़ून त्यावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू – उद्धव ठाकरे

>> राजेश देशमाने

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांची अमरावतीमधील दर्यापूर येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे भाजप सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र मुंबई लुटण्याचे जे प्रकार भाजप मिंधे सरकारकडून सुरू आहेत त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘सबकुछ मोदी आणि जमीन अदानी हे अजिबात चालणार नाही. आम्ही चालू देणार नाही. तुमचे हे जे सगळे मनसुबे आहेत. ते पाताळात गाड़ून टाकू’, असा घणाघात केला.

”ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी व महाराष्ट्र द्रोही याच्यातली आहे. आपण सर्व महाराष्ट्र प्रेमी म्हणून एकवटले आहोत. समोर सर्व महाराष्ट्र द्रोही आहेत. आपलं चांगलं चाललेल सरकार गद्दारी करून पाडलं. जी गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात नाही ती मिंध्यांच्या रक्तात आहे. महाराष्ट्राच्या हक्काचं जे काही आहे. हे ते सर्व ओरबाडून गुजरातला नेत आहेत. मग हे महाराष्ट्र प्रेमी होऊ शकतात का? म्हणूनच मी आता मैदानात उतरलो आहे. मला अभिमान आहे की महाविकास आघाडी एवढी मिळून मिसळून काम करतेय. जे काही करतोय ते महाराष्ट्राच्या हिताचं करतोय. वानखेडेजी मी तुम्हाला धन्यवाद देतोय की लोकसभेची जागा तुम्ही शिवसेनेला निवडून देत आलात. गद्दाराने आधीच इकडे वाट लावली होती. म्हणून 2019 ला ही जागा गेली. 2024 ची निवडणूक आली काँग्रेसने या जागेची मागणी केली. काँग्रेसने वानखेडेंचं नाव सांगताच मी एका क्षणात त्यांनी ही जागा दिल्याचे सांगितले. माझ्यासोबत विधीमंडळात काम करणारा माणूस, चांगला माणूस देशाच्या लोकसभेत जात असेल तर मी उगाच खेचाखेची कशाला करू. आपल्या हक्काच्या माणसाला दिल्लीत पाठवला. लोकसभा तुम्हाला दिला आता आम्हाला दर्यापूर पाहिजे असे मी त्यांना सांगितले. काँग्रेसनी सुद्धा एका क्षणाचा विलंब न लावता साहेब नुसती देणार नाही तर निवडून आणून देणार असे सांगितले. एवढ्या लवकर आपण मिळून मिसळून गेलो त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून धन्यवाद सांगतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असं कर्तृत्व महाराष्ट्राने लोकसभेला करून दाखवलं आहे. माजलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बुडाखाली महाराष्ट्राने ठिणगी पेटवली आहे. एक काळ असा होता की आपण त्यांच्यासोबत होतो. चाळीसच्यावर खासदार होते. यांना आपण खासदार दिले. आमदार दिले. वरची खालची सत्ता दिली. त्यानंतर यांच्या डोक्यात हवा गेली. मग हवा काढायला नको का?. सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादाने हे जे गॅसचे फुगे फुगले होते व वर वर जात होते. त्याला आपण टाचणी मारली आणि आला फुगा खाली. आता पुन्हा एकदा तेच करून दाखवायचं आहे. इथले जे खासदार होते ते कोणत्या मस्तीत होते ते तुम्हाला माहित आहे. एका साध्या व्यक्तीने तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने त्या गर्वाला पायदळी तुडवून टाकलं. हेच पुन्हा करायचं आहे. गजाननाच्या हातात मशाल दिली आहे. समोर एक गद्दार उभा आहे. अडीच वर्षापूर्वी यांनी केलेल्या गद्दारीने जी जखम झाली आहे ती जखम भळभळतेय. ती जखम घेून आपण वाट पाहत होतो सूड उगवण्याची. तो दिवस आता 20 तारखेला येतोय, असं उद्धव ठाकरे यांनी सांगताच जनतेतून पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणा दिल्या गेल्या.

”आपल्या सरकारचं काय वाईट चाललं होतं. पाच वर्ष तरी पूर्ण करू द्यायची होती. त्यानंतर मी काय वाईट करत होतो ते बोंबलून सांगायचं होतं. अडीच वर्षात शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती केली होती. ती कर्जमुक्ती केल्यानंतर कधीच तुमच्यासमोर येऊन मी शो केला नाही. कारण मी तुम्हाला जे कर्जमुक्त केलं. ते तुमच्यावर उपकार नव्हते केले तर मी माझं कर्तव्य पार पाडलं होतं. कमीतकमी त्रासात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्त करून दाखवलं होतं. मी कधीच अहंकराने शेखी मिरवली नव्हती. मी खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हतं केलं. आज याचं जे काही सुरू झाले. सगळे भाऊ. देवा भाऊ, दाढी भाऊ, एक जॅकेट भाऊ. यांच्यात भाऊंबंधकी एवढी झाली आहे की एका बाबतीत यांचे एक मत झाले आहे. आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. महाराष्ट्र गिळतायत, खातायत, ओबाडतायत. आता भले यांना महिलांसाठी प्रेम आलं असेल. पण महिलांच्या सुरक्षेचं काय. महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडतायत. बदलापूरमध्ये जे घडलं. त्या मातेने काय करायचं? चिमुरड्या मुलीवर शाळेत अत्याचार होत असेल व तिच्या आईच्या तक्रारीची कुणी दखल घ्यायला तयार नसेल तर काय चाटायची आहे का तुमची पंधराशे रुपयाची मदत. भाऊ भाऊ म्हणता. तिन्ही भावांनी जर तुमचं तोंड दाखवण्यासारखं असेल तर त्या माऊलीला भेटा आणि मी आहे तुझा भाऊ हे घ्या पंधराशे असं सांगा त्यांना. ती माऊली पहिलं पायातान काढून तुमचं तोंड फोडून काढेल. माझ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही मला लाच देता. यांच्यासारखं नाटक, थोतांड महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नव्हतं. महाराष्ट्रातले जे काही संस्कार आहे ते हे पुसून टाकत आहेत. सबकुछ मोदी आणि जमीन अदानी हे अजिबात चालणार नाही. आम्ही चालू देणार नाही. तुमचे हे जे सगळे मनसुबे आहेत. ते पाताळात गाड़ून त्याच्यावर आमच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपच्या नाराजीनंतरही अजितदादा मलिकांच्या प्रचारात आघाडीवर, म्हणाले कोणीही कितीही विरोध करू द्या तरीही.. भाजपच्या नाराजीनंतरही अजितदादा मलिकांच्या प्रचारात आघाडीवर, म्हणाले कोणीही कितीही विरोध करू द्या तरीही..
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराला वेग आला आहे. यंदाची लढत महाविकास आघाडीविरोधात महायुती अशीच होणार आहे. दरम्यान भाजपकडून राष्ट्रवादीचे...
पुन्हा पैशांचं घबाड, विरार आणि नालासोपाऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या रकमेसह 2 संशयास्पद व्हॅन सापडल्या, तपासाला वेग
‘खंजीर मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला’, राज ठाकरेंच्या शिलेदाराचंच खळबळजनक ट्विट
उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेच्या तरुण तडफदार नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
भाजपच्या विरोधाला अजित पवारांची केराची टोपली, उघडउघड नवाब मलिक यांचा प्रचार, महायुतीत काय होणार?
वरळीत आदित्य ठाकरेंची मोठी खेळी; एकनाथ शिंदेंना धक्का, घडामोडींना वेग
महाविकास आघाडीचा तेलंगणा-कर्नाटक पॅटर्न; विधानसभेत विजयाचे बांधणार का तोरण?