“मी या जगातील सर्वांत बेकार व्यक्ती”, असं का म्हणाली आमिर खानची लेक?
आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच तिच्या मानसिक स्वास्थ्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयराने वयाच्या 27 व्या वर्षीही पैशांसाठी आईवडिलांवर अवलंबून राहिल्याबद्दल अपराधिपणा वाटत असल्याची भावना व्यक्त केली.
'पिंकविला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आयरा म्हणाली, "मी 26-27 वर्षांची आहे, माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत आणि या जगातली मी सर्वांत बेकार व्यक्ती आहे. मी काहीच काम करत नाहीये."
या मुलाखतीत आयरासोबत आमिरसुद्धा उपस्थित होता. कमाईविषयी आयराचं वक्तव्य ऐकल्यानंतर आमिर म्हणतो, "मानसिक स्वास्थ्याविषयीचं आमचं अगत्सु फाऊंडेशन सुरू करण्यापूर्वी ती काही पैसे कमवत नव्हती किंवा काही विशेष असं करत नव्हती असं आयराला म्हणायचं आहे. पण आयरा पैसे कमवत नाही, ही माझ्यासाठी कधी समस्याच नव्हती. त्याउलट तिने इतरांची मदत करण्याचं ठरवलंय ही खूप मोठी गोष्ट आहे."
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List