या गोष्टीला वैतागून अनुष्का-विराटने लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला; मोठं कारण आलं समोर
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानली जाते. हे कपल नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या फॅमिली पिकनीकमुळे तर कधी त्यांच्या अध्यात्माच्या प्रवासामुळे. आणि जेव्हा ही जोडी एकत्र असते तेव्हा सर्वांचेच लक्ष वेधून घेते. विराटसोबत लग्न झाल्यावर आणि बाळ झाल्यानंतर अनुष्का शर्मा फिल्मी जगापासून दूरच राहिली आहे. तसेच अनुष्का आणि विराट कोहली 2024 पासून लंडनमध्ये राहत आहेत. पण अचानक त्यांनी भारत सोडून लंडनला स्थायिक होण्याचं कारण जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक होते.
अनुष्का आणि विराट कोहलीने भारत सोडून लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला?
आता त्याच्या लंडनला जाण्यामागील खरे कारण समोर आले आहे. विशेष म्हणजे माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी विराट-अनुष्का दोघांनीही भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला याचं कारण स्पष्ट केलं.
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने, जे हेल्थ अँड वेलनेस यूट्यूब चॅनल चालवतात, त्यांनी अलीकडेच यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने त्याच्या पॉडकास्टवर आमंत्रित केले होते. डॉ. श्रीराम नेने यांनी या मुलाखतीत अनुष्का आणि विराटने लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला हे सांगितले.
डॉक्टर नेनेंनी सांगितलं खरं कारण
संभाषणादरम्यान, डॉ. नेने यांनी अनुष्कासोबत झालेल्या संभाषणाची आठवण करून दिली आणि म्हणाले, “एक दिवस अनुष्काशी बोलताना तिने मला सांगितले की ते लंडनला जाण्याचा विचार करत आहेत कारण त्यांना इथे मिळालेल्या यशाचा योग्य आनंद घेता येत नाही. आम्हाला त्यांची समस्या समजते कारण ते जे काही करतात ते नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेतात, ज्यामुळे कधीकधी त्यामुळे त्रासही होऊ शकतो.”
मुलांना या सर्वांपासून दूर ठेवायचं होतं…
डॉ. नेने यांनी पुढे सांगितले की, अनुष्का आणि विराट देखील लंडनला जाण्यामागे आणखी एक कारण म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांना सर्व प्रसिद्धीपासून दूर ठेवायचं होतं. त्यांनी पुढे म्हटलं , “आम्ही सर्वांशी मिळून मिसळून राहतो, मी खूप बिंदास (कूल) आहे. पण कधीकधी ते आव्हानात्मक बनते. सर्वत्र सेल्फी मोमेंट हा असतोच. ते इतके वाईट नाही पण काही काळानंतर ते नकोस होतं. विशेषतः जेव्हा तुम्ही डिनर किंवा लंचसाठी बाहेर जाता. तेव्हा तुम्हाला सभ्यतेत राहावं लागतं. ते माझ्या पत्नीसाठी एक समस्या बनते. पण अनुष्का आणि विराट खूप गोड लोक आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांना सामान्य पद्धतीने वाढवायचे आहे.”
म्हणून अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलांना या झगमगत्या जगापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List