एका हातात चाकू, दूसऱ्या हातात हेक्सा ब्लेड…त्या रात्री नेमके काय घडलं, सैफ अली खान याने पोलीसांना काय-काय सांगितलं?

एका हातात चाकू, दूसऱ्या हातात हेक्सा ब्लेड…त्या रात्री नेमके काय घडलं, सैफ अली खान याने पोलीसांना काय-काय सांगितलं?

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरातच झालेल्या चाकू हल्ल्या संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. सैफ याने पोलिसांना दिलेल्या जबाबात १५ जानेवारी रोजी त्याच्या घरात त्याच्या घरात अज्ञात व्यक्ती घुसल्यानंतर त्यानंतर नेमकं काय काय झाले याची माहीती समोर आली आहे. त्या रात्री आरोपी कसा पळाला आणि सैफने त्याला कसे पळवून लावले याची कहाणी समोर आली आहे.

सैफ अली खान याने पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबात काय-काय सांगितले ते पाहूयात. सैफ याने म्हटले की १५ जानेवारी रोजी रात्री ७.३० वाजता मी माझ्या मुलासोबत जेवण घेतले.माझी पत्नी करीना काही कामानिमित्त बाहेर गेली होती. जेवल्यानंतर काही वेळी टीव्ही पाहिल्यानंतर रात्री सुमारे १० वाजता मी माझ्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेलो. माझा मोठा मुलगा तैमुरला झोपविण्यासाठी त्यांची आया गीता त्याला बेडरुममध्ये घेऊन गेली. तर छोटा मुलगा जे बाबा याला आया जुनु आणि एलियामा फिलीम त्याच्या खोलीत घेऊन गेली.

सैफ अली खान याने जबाबात काय काय सांगितले?

माझी पत्नी रात्री दीड वाजता घरी आली. रात्री सुमारे २ वाजता जेव्हा आम्ही आमच्या खोलीत होतो. तेव्हा जुनु घाबरलेल्या अवस्थेत आमच्या खोलीत आली आणि म्हणाली की जे बाबा याच्या खोलीत एक माणूस असून त्याच्या हातात चाकू असून तो पैसे मागत आहे. जुनु खूप घाबरलेली होती. मी आणि पत्नी करीना लागलीच जे बाबाच्या खोलीच्या दिशेने पळालो. तेव्हा गीताही तेथे आली होती. मी पाहीले की काळ्या रंगाचे कपडे घातलेला, डोक्यावर टोपी सारखे काही लावलेला, अंगाने बारीक असलेला, सावळ्या रंगाचा, वय ३० ते ३५ असलेला एक माणूस जे बाबा याच्या बेडच्या उजव्या बाजूला होता. त्याच्या उजव्या हातात चाकू आणि डाव्या हातात हेक्सा ब्लेड घेऊन उभा होता. सिस्टर एलियामा फिलीप जे बाबा याच्या बेडच्या डाव्या बाजूला उभी होती.

सैफने चोराला विचारले कोण आहेस आणि काय पाहीजे ?

मी त्याला विचारले की तू कोण आहेस ? तुला काय पाहिजे. तेव्हा तो लागलीच जे.बाबा याच्या दिशेने वळला. त्यानंतर आम्हा दोघांत झटापट सुरु झाली.त्यानंतर मी त्याला समोरुन पकडले. तेव्हा त्याने माझ्या मान, पाठ आणि हातापायांवर आणि छातीवर वार केले. हे पाहून करीना जोरात ओरडली की जे.बाबाला लवकर बाहेर काढ. त्यानंतर सिस्टर एलियामा आणि करीना यांनी जे.बाबाला खोलीतून बाहेर काढले.

सैफ अली खान याने जबाब नोंदवला आहे. त्यात तो म्हणतो की जेव्हा माझी आरोपीशी झटापट होत होती. तेव्हा मी त्याला पकडून ठेवले होते. आणि तो लागोपाठ वार करीत होता. गीताने देखील त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.परंतू त्या चोराने गीताच्या हातावर आणि पाठीवर वार केले. त्यानंतर मी त्या जोराने ढकलले.त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर मी आणि गीता यांनी जीव वाचविण्यासाठी खोलीचा दरवाजा बंद करुन पळालो. आणि चोराला मारण्यासाठी काही तरी आणण्यासाठी १२ व्या मजल्यावर गेलो.

 तैमूर स्वत:  म्हणाला पापा मी देखील येतो तुमच्या सोबत

त्यानंतर माझ्या घरातला नोकर हरी आणि अन्य माझ्या मदतीला धावले. सर्वांनी घरात घुसलेल्या माणसाला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतू तो काही सापडला नाही. तेव्हा माझ्या पत्नी करीनाने सांगितले की खाली चला. मग आम्ही बिल्डींगच्या खाली आलो. त्यामुळे आम्ही सर्व लिफ्टने खाली आलो. चाकू लागल्याने सलग रक्तस्राव होत होता. त्यानंतर मी बिल्डींगच्या मेन गेटपर्यंत आलो. नोकर हरी आणि एलियामा यांनी एक ऑटो रिक्षा थांबविली. त्यात आम्ही बसलो तर तैमूर म्हणाला पापा मी देखील येतो तुमच्या सोबत. त्यामुळे मी त्यालाही घेऊन आलो. त्यानंतर नोकर हरी , माझा मुलगा तैमूर आणि मी उपचारासाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये पोहचलो. तेथे मला अॅडमिट करुन माझ्यावर शस्रक्रिया केली.

अभिनेता म्हणाला की घटनेत एलियामा फिलीम आणि गीता उर्फ लेखी तमांग देखील जखमी झाले. एलियामा फिलिम यांच्या जबाबावरुन वांद्रे पोलीसांनी आमच्या घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्ती विरोधात केस दाखल केली. आणि नंतर आरोपीला अटक झाली. मला नंतर कळले की त्या आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल असून तो एक बांगलादेशी नागरीक आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ही बॉलिवूड अभिनेत्री होती तिच्या शाळेतील शिक्षकाच्या प्रेमात; 39 व्या वर्षीही आहे सिंगल ही बॉलिवूड अभिनेत्री होती तिच्या शाळेतील शिक्षकाच्या प्रेमात; 39 व्या वर्षीही आहे सिंगल
हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी केवळ त्यांच्या अभिनय आणि चित्रपटांमुळेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिल्या...
Latur News – लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस, फळबागांचे नुकसान; शेतकऱ्यांना फटका
हिंदुस्थानने झेलम नदीमध्ये पाणी सोडले; पाकिस्तानात पूर, आणीबाणी लागू
पाकिस्तानी भैया, माझा मित्र! अतिरेक्यासोबत बंगाली तरुणाच्या फोटोने खळबळ
अनियंत्रित पिकअप वाहनाने 11 स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, 7 जणांचा मृत्यू; चौघे गंभीर
Jammu Kashmir – दोन दहशतवादी मोबाईलमध्ये कैद; मावळमधील पर्यटकाकडे मोठा पुरावा
सिंधू जल करार रद्द : पाकला झोंबलं म्हणून अशी आगलाऊ भाषा, लेफ्टनंट कर्नल डॉ.सतीश ढगे काय म्हणाले?