अख्खा देश फिरलेला शाहरुख खान आजपर्यंत काश्मीरला का गेला नाही? वडिलांना दिलेलं वचन पाळलं
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या अभिनयामुळे सर्वांच्या मनावर राज्य करतो. अभिनयाव्यतिरिक्त, शाहरुख खान त्याच्या कुटुंबावरील प्रेमासाठी आणि त्याच्या पालकांशी असलेल्या भावनिक नात्यासाठी देखील ओळखला जातो. एका कार्यक्रमादरम्यान शाहरूख खानने एक भावनिक घटना सांगितली. त्यामुळेच तो आद्यापपर्यंत कधीच काश्मीरला गेला नाही.
शाहरूख का कधी फिरण्यासाठी काश्मीरला गेला नाही?
जेव्हा शाहरूख खान अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय टीव्ही शो कौन बनेगा करोडपतीमध्ये आला होता तेव्हा त्याने हा भावनिक प्रसंग सांगितला. त्याच्या काश्मीरला न जाण्याच्या मागे वैयक्तिक कारण म्हणजे त्याच्या वडिलांना दिलेलं वचन.
शाहरुखने शोमध्ये सांगितले की त्याची आजी काश्मीरची होती, त्यामुळे या ठिकाणाशी त्याचे भावनिक नाते आणखी घट्ट झाले आहे. तो म्हणाला की माझ्या वडिलांनी मला आयुष्यात सांगितले होते की मला तीन ठिकाणी भेट द्यायलाच हवी इस्तंबूल, रोम आणि काश्मीर. पण त्यांनी असेही म्हटले होते की माझ्याशिवाय तुम्ही इतर दोन ठिकाणे तू पाहू शकतो. पण माझ्याशिवाय काश्मीर पाहू नको. शाहरुख म्हणाला की, माझ्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांना स्वत:ला त्यांना काश्मीर दाखवायचं होतं. हे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. पण त्याआधीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्या दिवसापासून शाहरुखने हे वचन पाळण्याचा निर्णय घेतला.
वडिलांचा शब्द पाळला
तो पुढे म्हणाला की “तो जगभर फिरला आहे पण तो कधीही काश्मीरला गेला नाही. तो म्हणाला की मला अनेक वेळा संधी मिळाल्या, मित्रांनी मला फोन केला, कुटुंब सुट्टीवर गेले पण मी कधीच गेलो नाही. कारण वडिलांनी सांगितले होते की त्यांच्याशिवाय काश्मीर पाहू नये”. शाहरुखने सांगितलेल्या या भाविनक प्रसंगामुळे प्रेक्षकही खूप भावूक झाले होते. तसेच त्यांनी शाहरूखच्या या निर्णयाचं कौतुकही केलं. सोशल मीडियावरही चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. इतका मोठा सुपरस्टार असूनही, त्याने इतक्या वर्षांपासून आपल्या वडिलांच्या शब्दांचा आदर केला. ही एक अशी कहाणी होती ज्याने मुलगा आणि त्याच्या आतला माणूस जगासमोर आणला.
या चित्रपटासाठी शाहरुख काश्मीरला गेला होता का?
तथापि, काही चाहत्यांनी असेही आठवण करून दिली की 2012 मध्ये यश चोप्रा यांच्या ‘जब तक है जान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख काश्मीरला गेला होता. चित्रपटाचे अनेक दृश्ये गुलमर्ग, पहलगाम, लडाख आणि पँगोंग तलावात चित्रित करण्यात आली होती. एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले की कदाचित हा जुना केबीसी भाग असेल किंवा तो त्याच्या वैयक्तिक सहलीबद्दल बोलत असेल, पण तो जेटीएचजेसाठी काश्मीरला नक्कीच गेला होता.
चाहत्यांनी शाहरुखची बाजू घेतली
तेव्हा अनेक चाहत्यांनी शाहरुखच्या बाजूनेही कमेंट्स केल्या. ते म्हणाले की तो काश्मीरकडे कामाचं ठिकाण म्हणून कदाचित पाहत असेल, त्याच्या वडिलांशी असलेल्या भावनिक नात्याने नाही. शाहरुख यश चोप्रा यांना आपला गुरू आणि वडील मानत असे, कदाचित म्हणूनच तो जेव्हा जेव्हा काश्मीरला जायचा तेव्हा तो यशजींसोबत जायचा.असंही अनेक चाहत्यांनी आठवण करून दिली.
सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये त्याची मुलगी सुहाना खान देखील दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्येही खूप उत्साह आहे. शाहरुखची ही कहाणी मुलाने आपल्या वडिलांना दिलेले वचन किती पवित्र असतं आणि त्याचा आदर कसा राखला गेला पाहिजे याची साक्ष देते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List