नवऱ्याच्या निधनानंतर अभिनेत्रीचं टक्कल, नवऱ्याच्याच ब्लेझरमध्ये फोटोशूट करत ओलांडल्या मर्यादा

नवऱ्याच्या निधनानंतर अभिनेत्रीचं टक्कल, नवऱ्याच्याच ब्लेझरमध्ये फोटोशूट करत ओलांडल्या मर्यादा

Bollywood Actress bald look: 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शांती प्रिया तुम्हाला आठवत असेलच. अभिनेत्रीने अक्षय कुमार याच्यासोबत ‘सौगंध’ तर, अभिनेता सनी देओल याच्यासोबत ‘वीरता’ आणि अन्य अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली. आता शांती प्रिया मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अशात शांती प्रिया हिने दिवंगत नवऱ्याच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केलं आहे. नवऱ्याच्या निधनानंतर अभिनेत्रीचा लक्षवेधी लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

टक्कल करून अभिनेत्री नवऱ्याच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केलं आहे. अनेकांना शांती प्रिया हिचा लूक आवडलेला आहे. तर अनेकांनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. काही दिवसांपूर्वी शांती प्रिया हिने टक्कल आणि नव्या नवरीच्या लूकमध्ये फोटोशूट केलं होतं.

आता देखील अभिनेत्रीने हटके लूक करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणते, ‘नुकताच मी टक्कल केलं आहे. महिला असल्यामुळे आपण आपल्या भोवती मर्यादा ठरवतो. नियमांचं पालन करतो आणि स्वतःला एका पिंजऱ्यात बंद करतो. पण या बदलासह मी स्वतःला मुक्त केलं आहे.’ सध्या अभिनेत्रीने पोस्टसाठी लिहिलेलं कॅप्शन देखील चर्चेत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shanthi Priya (@shanthipriya333)

 

शांती प्रिया हिने मेकअपसह तिच्या टक्कल लूकला एक उत्कृष्ट टच दिला. तिने गुलाबी ओठ, तपकिरी आयशॅडो, आयलायनर, मस्कारा आणि ब्लश लावून तिचे सौंदर्य वाढवलं आहे. हटके लूक करून अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आणि आता लोक सोशल मीडियावर तिच्याबद्दल चर्चा करत आहेत.

अनेकांना अभिनेत्री नवा लूक आवडला आहे. तर अनेकांनी टीका केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘हे काय केलस… लांब केस म्हणजे दाक्षिणात्य महिलांचं सौंदर्य आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सॉरी… पण तू नव्हतं करायला पाहिजे…’, ‘आता टकली म्हणालो की बॉडी शेमिंगचा आरोप करेल…’ असं देखील अभिनेत्रीला नेटकरी म्हणत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून पुण्यात राडा काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून पुण्यात राडा
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून...
बँक खात्यावर मारला डल्ला
व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट प्रोफाइल फोटो लावून 30 लाख रुपये उकळले 
मला माफ करा… पण? ब्राह्मणांवर दिलेल्या विधानानंतर अनुराग काश्यप नरमला
अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा हिट-अँड-रनमध्ये मृत्यू, कुटुंबावर दुखाचा डोंगर
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडली, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
IPL 2025 – टीम डेव्हिडची झुंजार खेळी व्यर्थ, पंजाबचा बंगळुरूवर 5 विकेटने दणदणीत विजय