कामवाल्या बायकांसारखं होतं जान्हवीचं आयुष्य; म्हणाली, ‘खोचलेली साडी, हातात बांगल्या आणि…’
Bigg Boss Marathi Fame Janhavi Killekar: ‘बिग बॉस’मुळे अनेक सेलिब्रिटींच्या करियरला नवी दिशा मिळाली. ‘बिग बॉस’मुळे नव्या कलाकारांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत देखली वाढ झाली. असंच काही मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्यासोबत देखील झालं. बिग बॉस मराठी सीझन 5 फेम जान्हवी किल्लेकरने बिग बॉसच्या घरात राहून चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर अनेकदा अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं. पण सामान्य स्त्री ते अभिनेत्री पर्यंतचा जान्हवीचा प्रवास साधा नव्हता. एका मुलाखतीत खुद्द जान्हवीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
लग्नानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल जान्हवी म्हणाली, ‘लग्नानंतर देखील मी चाळीत राहत होते. मी एका साध्या घरात आणि चूल आणि मूल अशीच होते. लग्नानंतर सात वर्ष मी फक्त साडी नेसलेली आहे. हातात हिरव्या बांगड्या टिकली.. हे माझं आयुष्य होतं. त्या साड्या सुद्धा अगदीच गलिच्छ… खोचलेली साडी… कारण दिवसभर काम करायला लागायचं. घरातली कामं करायचीत, भांडी घासायची, जेवण बनवायचं… सगळं करायचंय. त्यामुळे ती खोचलेली साडी… साडीला पिन नाही… अगदीच असं गुंडाळलेलं… कामवाल्या बायका कशा असतात. अगदी तसंच माझं आयुष्य होतं.’
पुढे जान्हवी म्हणाली, ‘ती जान्हवी आणि या जान्हवीमध्ये फार फरक आहे. मी स्वतःला बदललं आहे. आपल्याला समजणं फार गरजेचं आहे, एकच आयुष्य मिळतंय… आपल्याला माहिती नाही आपण पुन्हा जन्म घेवू किंवा नाही. कुठल्या आवस्थेत असू… आपल्याला काहीच माहिती नाही… त्यामुळे आता जे देवाने दिलं आहे, त्याचा आनंद घ्या. आयुष्य जगा… मी प्रत्येक स्त्रीला एकच गोष्ट सांगेल की कुटुंब आहे मुलगा आहे सगळं काही ठिक आहे. पण त्यामध्ये अडकून राहू नका. स्वतःसाठी जगा. मी एवढंच सांगेल स्वतःसाठी जगा… तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट करा…’ असं देखील जान्हवीने सर्व महिलांना सांगितलं.
जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ती सध्या स्टार प्रवाह वरील अबोली या मालिकेत इन्स्पेक्टर ची भूमिका साकारत आहे. जान्हवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘बिग बॉस’मध्ये देखील अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.
जान्हवी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List