Hair Removal- आता वॅक्सिंगला म्हणा अलविदा!!! शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी या 4 पद्धतींचा वापर करा
शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी, आपण प्रामुख्याने वॅक्सिंगचा पर्याय स्विकारतो. परंतु वॅक्सिंग करताना होणाऱ्या वेदना या अनेकांना सहन होत नाहीत. म्हणूनच काहीजण वॅक्सिंगचे नाव काढलं तरी घाबरतात. परंतु तुम्हाला तुमच्या शरीरावरील नको असलेल्या केसांमुळे लाज वाटत असेल तर, काही घरगुती उपाय आहेत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही शरीरावरील नको असलेले केस काढून टाकू शकता. अनेक मुलींना वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेला लालसरपणा, खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणून अनेकजणी वॅक्सिंग करण्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्हालाही वॅक्सिंग करायला आवडत नसेल तर, आता अजिबात काळजी करु नका. काही घरगुती उपायांनी शरीरावरील अनावश्यक केस काढू शकाल. या उपायानंतर, तुम्ही वॅक्सिंगला कायमचा निरोप द्याल.
लिंबू आणि साखर
तुम्हाला 2 चमचे लिंबाच्या रसात एक चमचा साखर मिसळावी लागेल आणि त्यात 8 ते 9 थेंब पाणी घालावे लागेल. हे मिश्रण गरम करा आणि थोडे थंड झाल्यावर ते शरीरावर लावा आणि सुमारे 20 ते 25 मिनिटांनी पाण्याने धुवा. या मिश्रणात साखर असते जी नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि गरम साखर केसांना चिकटते आणि लिंबू नैसर्गिकरित्या त्वचेला ब्लीच करते. हे मिश्रण लावल्याने वॅक्सिंगची गरज भासणार नाही.
मध आणि लिंबू
वॅक्सिंग करण्याऐवजी तुम्ही मध आणि लिंबाची पेस्ट लावू शकता. म्हणून, तुम्हाला 2 चमचे साखर, लिंबाचा रस आणि एक चमचा मध आवश्यक आहे. या तिन्ही गोष्टी एकत्र करा आणि गरम करा. जर तुम्हाला मिश्रण पातळ करायचे असेल तर थोडे पाणी घाला. आता प्रथम केसांवर थोडा कॉर्न स्टार्च लावा, त्यानंतर हे मिश्रण केसांवर लावा आणि आता वॅक्सिंग स्ट्रिपच्या मदतीने केस उलट दिशेने ओढा. मध त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते आणि कोरड्या त्वचेसाठी एक प्रभावी उपाय आहे.
ओटमील आणि केळी
या दोन्ही गोष्टी एकत्र करून तुम्हाला पेस्ट तयार करावी लागेल. हे मिश्रण शरीरावर लावा आणि 15 मिनिटांनी मालिश करताना पाण्याने धुवा. ओटमील हे एक हायड्रेटिंग स्क्रब आहे जे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे लालसरपणा दूर करण्यास मदत करते. चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी स्क्रब परिपूर्ण आहे. हे लावल्याने तुमची त्वचा चमकू लागेल.
बटाटा आणि मसूर डाळ
एका भांड्यात मध, लिंबाचा रस आणि पाच चमचे बटाट्याचा रस आणि मसूर मिक्स करून पेस्ट तयार करावी लागेल. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List