उन्हाळा आल्यावर तुमचाही फ्रीज बिघडतो का! फ्रीजमध्ये बिघाड होऊ नये म्हणून अशी काळजी घ्या, वाचा सविस्तर
उन्हाळा सुरु झाल्यावर, बहुतांशी घरांमध्ये फ्रीजमध्ये बिघाड सुरु होतो. पाणी थंड होण्याचे प्रमाण कमी होते किंवा काही ना काही फ्रीजमधून आवाज येण्यास सुरुवात होते. खासकरुन उन्हाळ्यात या समस्या मोठ्या प्रमाणावर सुरु होतात. यामुळे आपल्याला वाटतं की, फ्रीज खराब झाला की काय.. परंतु असे नसून, फ्रीजमध्ये पाणी योग्यरित्या थंड न होण्याची इतर अनेक कारणे असतात. तिच कारणे आपण पाहणार आहोत.
सर्वात आधी फ्रीजचे थर्मोस्टॅट सेटिंग्ज बघा
फ्रीजसाठी आदर्श थर्मोस्टॅट सेटिंग हे ३ ते ५ अंश सेल्सिअस दरम्यान असते. फ्रीजर कंपार्टमेंट -१८ अंश सेल्सिअस असते. बाह्य तापमान जास्त असल्याने, फ्रिज सेटिंग ३ अंश सेल्सिअसवर आहे का ते तपासा.
फ्रीजच्या एअर व्हेंटस् सेटिंग्ज तपासा
ब्लॉक्ड एअर व्हेंट्स हे एक महत्त्वाचे कारण फ्रीजमधील कमी थंड पाण्यास कारणीभूत असू शकते. रेफ्रिजरेटर थंड हवेच्या प्रसरणातून योग्य थंडावा देतो. त्यामुळेच ब्लॉक्ड एअर व्हेंट्समुळे एअरफ्लोमध्ये व्यत्यय येतो. यामुळे थंड कमी होण्यास सुरुवात होते, तसेच फ्रीजमधील ठेवलेल्या वस्तूंवर दव जमा होते. अन्न खराबही होऊ शकते. म्हणूनच कॉइल्स स्वच्छ करण्यासाठी ब्रश किंवा व्हॅक्यूमचा वापर करावा.
फ्रीजची जागा
थंड होण्याच्या बाबतीत फ्रीजचे स्थान देखील महत्त्वाची भूमिका बजावते. फ्रीजची जागा ही हवेशीर असल्यास पाणी थंड वेगाने होण्यास मदत होते. फ्रीजच्या मागच्या बाजूमध्ये आणि भिंतीमध्ये अंतर हे कमी नसावे. तसेच फ्रीजजवळ कोणताही उष्णतेचा स्त्रोत नसावा. योग्य हवेच्या प्रवाहासाठी फ्रिजच्या मागे आणि बाजूंना २-३ इंच जागा असावी.
फ्रीज डीफ्रॉस्ट करा
फ्रीजमध्ये बर्फ साचतो आणि त्यामुळे हवेच्या छिद्रांना अडथळा निर्माण होतो आणि थंडावा कमी होतो. म्हणूनच फ्रीज ४-६ तासांसाठी डीफ्रॉस्ट करा किंवा फ्रीजच्या मागील बाजूस असलेले ड्रेन होल कोमट पाण्याने साफ करा.
दाराचे सील तपासा
दारांवर गॅस्केट सील असते हे सील गरम हवा फ्रीजमध्ये जाण्यापासून रोखते. तुटलेले किंवा खराब झालेले सीलमुळे फ्रीज योग्यरित्या काम करत नसण्याचे कारण असू शकते. गॅस्केट सील खराब झाले असतील तर, ओल्या कापडाने आणि डिश साबणाने स्वच्छ करावे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List