चीन नव्हे आता हिंदुस्थान अ‍ॅपलचे नवे केंद्र!

चीन नव्हे आता हिंदुस्थान अ‍ॅपलचे नवे केंद्र!

अ‍ॅपलने मागील 12 महिन्यांत हिंदुस्थानात तब्बल 22 अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन तयार केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी वाढ झाली असून प्रत्येक 5 पैकी 1 आयफोन हिंदुस्थानात बनवला जातो. या आकडेवारीवरून अ‍ॅपल आणि त्याचे पुरवठादार आता चीनमधून हिंदुस्थानकडे वळत असल्याचे स्पष्ट होते. जागतिक पातळीवर व्यापार युद्धाचा भडका उडाला असताना अ‍ॅपल चीनबाहेर आपले पाय पसरत आहे.

अमेरिकेचा चीनवरील परस्पर कर 145 टक्के आहे, तर हिंदुस्थानचा 26 टक्के कर एवढा आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे चीनला फटका बसला असल्याचे बोलले जाते. हिंदुस्थानात अ‍ॅपलचे प्रमुख पुरवठादार फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स आहेत. मार्च 2025 पर्यंतच्या आर्थिक वर्षात अ‍ॅपलने हिंदुस्थानातून 17.4 अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन निर्यात केले, असे अलीकडेच सरकारने सांगितले आहे. अमेरिकेचे टॅरिफ धोरणाचा फटका चीनला बसला आहे. अ‍ॅपलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…” मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही...
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज
मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री