‘जमवाजमवी’ची चांगली कमवाकमवी
प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळत आहे. राजकमल एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतीक्षित असा ‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. निखळ मनोरंजनासाठी भट्टी जमून आली आहे.
‘अशी ही जमवाजमवी’ हा विनोदी, कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरला आहे. प्रेम हा विषय चित्रपटासाठी नवीन नाही, किंबहुना प्रेम हाच चित्रपटाचा आत्मा आहे? असे म्हटले पाहिजे. लोकेश गुप्ते या दिग्दर्शकाने चित्रपटातील पात्र योजना फार विचारपूर्वक केली आहे.
अशोक सराफ, वंदना गुप्ते, सुनील बर्वे, सुलेखा तळवळकर, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद फाटक असे अभिनयात तबरेज कलाकार, तर नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे ओंकार कुलकर्णी आणि तनिष्का विशे असे टवटवीत चेहरे आहेत. साधे, सहज, सोपे संवाद ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. नवीन कलाकारांनी जुन्या जाणत्या कलाकारांना सुंदर साथ दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List