IPL 2025 – जिंकता जिंकता दिल्ली रनआऊट, मुंबईचा 12 धावांनी निसटता विजय

IPL 2025 – जिंकता जिंकता दिल्ली रनआऊट, मुंबईचा 12 धावांनी निसटता विजय

विजयासाठी 12 चेंडूंत केवळ 23 धावांची गरज असताना सलग चार सामने जिंकून अपराजित असलेली दिल्ली जिंकता जिंकता रनआऊट झाली. आशुतोष शर्माने जसप्रीत बुमराला सलग दोन चौकार मारत विजयी लक्ष्य 9 चेंडूंत 15 धावांवर आणले होते, मात्र त्यानंतर सलग तीन चेंडूंवर आशुतोष शर्मा, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा या तिन्ही फलंदाजांना रनआऊट करण्याची करामत मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी दाखवली आणि अवघ्या 12 धावांनी विजयाचा घास दिल्लीच्या मुखातून खेचून आणला.

मुंबईने रायन रिकल्टन (41), सूर्यकुमार यादव (40), तिलक वर्मा (59) आणि नमन धीर (ना. 38) यांच्या फटकेबाजीमुळे 5 बाद 205 अशी आव्हानात्मक मजल मारली होती. मुंबईच्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेक फ्रेझर-मॅकगर्कला डावाच्या पहिल्याच चेंडूवर दीपक चहरने बाद केले. मात्र या सनसनाटी सुरुवातीनंतर करुण नायरने 40 चेंडूंत 89 धावांची घणाघाती खेळी करत सलामीवीर अभिषेक पोरेलसह 119 धावांची भागी रचत दिल्लीला सलग पाचव्या विजयाच्या दिशेने नेले.

मात्र ही जोडी फुटल्यानंतर सामन्यात चढउताराची एण्ट्री झाली. करुण शर्माने पोरेल आणि केएल राहुलची विकेट काढत सामना मुंबईच्या दिशेने वळवला. शेवटच्या क्षणी आशुतोष शर्मा (17) आणि विपराज निगमने (14) तो पुन्हा दिल्लीकडे झुकवला, पण बुमराच्या षटकात दिल्ली विजयाच्या दिशेने धावताना धडपडली आणि सलग तीन फलंदाजांना अचूक चेंडूफेकीने धावबाद करत मुंबईने आपल्या दुसऱया विजयाची नोंद केली. 36 धावांत 3 विकेट टिपणारा करुण शर्मा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…” मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही...
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज
मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री