महाराष्ट्रात कसा विजय मिळवला हे त्यांच्या प्रिय अमेरिकन मैत्रिणीने सांगितलेलं आहे, EVM वरून संजय राऊत यांचा टोला
अमेरिकेमध्ये इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्ष तुसली गेबार्ड यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवता येतो आणि ईव्हीएम हॅक होऊ शकतो असे सांगितले असे विधान शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच या तुलसी गेबार्डवर पंतप्रधान मोदींचे खास प्रेम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कसा विजय मिळवला हे तुमच्या प्रिय मैत्रिणींने सांगितलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा असा टोला संजय राऊत यांनी लगावला.ट
नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, नाशिक मध्ये होणाऱ्या या शिबिराचे वैशिष्ट्य असे की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भाषण आम्ही तिथे दाखवणार आहे. हे भाषण तुम्ही कदाचित कधी ऐकलं नसेल. एका पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांची एक प्रकारे उपस्थिती असणार आहे. नाशिकच्या शिबिराची जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेनेचे आणि ठाकरे घराण्याचे नाशिकवर विशेष प्रेम आहे. मुंबई बाहेरचं पहिलं शिबीर हे नाशिकमध्ये घ्यावं ही सूचना होती.
तसेच आमच्याकडे उमेदवार राहतील न राहतील याची चिंता चंद्रकांत पाटलांनी करू नये. अमेरिकेमध्ये इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्ष तुसली गेबार्ड यांनी ईव्हीएमसंदर्भात सांगितले आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवता येतो आणि ईव्हीएम हॅक होऊ शकतो. या तुलसी गेबार्डवर पंतप्रधान मोदींचे खास प्रेम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कसा विजय मिळवला हे तुमच्या प्रिय मैत्रिणींने सांगितलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही. त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. शहांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला. त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे. त्यांना माहित नसेल तर मी सांगतो, अजिबात चिंता करू नका. उद्धव ठाकरेंनाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही, एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची, त्यांच्या पक्षाची चिंता करावी. लांड्या लबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात ती सत्ता तुम्हाला लख लाभो. भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्याबरोबर बसलेले आहे, तुम्ही त्यांना सांभाळत बसा असे संजय राऊत म्हणाले. तसेच अमेरिकेच्या गुप्तचर संघट संस्थेच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड आहेत. या तुळशीबाईंना कमळाबाईने ते गंगाजळचं कुंभच भरून दिलं होतं. त्यामुळे बहुतेक त्या बाईंना खरं बोलण्याची बुद्धी झाली. त्यांनी खरं सांगून टाकलं की मोदी आणि त्यांचे लोक भारतात कसे जिंकले. ईव्हीएम मधला घोटाळा हे पहिलं कारण आणि ईव्हीएम हायजॅक होतात हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. ईव्हीएम मुळे निकाल फिरवले जाऊ शकतात हे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र, हरियाणा, दिल्लीमधले जे निकाल आहेत ते बोगस आहेत, हे या तुळशींच्या वक्तव्यातून स्पष्ट होतंय असेही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा आवाज सुरू आहे तो फुले आणि फडणवीसांचा वाद आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात, औरंगजेबाच्या कबरीचा वाद पण अंगलट आल्यावर त्यांनी मिटवला. असे अनेक वाद त्यांनी मिटवलेले आहेत. मराठा समाजाचा वाद सुद्धा त्यांनी मिटवला. मग जो महाराष्ट्र फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे. त्या फुलांच्या संदर्भात काही जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात ते काय आमचे देवेंद्र फडवणीस यांच्या शब्दाबाहेर आहेत का? छावा, ताश्कंद फाईल, कश्मीर फाईल चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते. त्यात तुम्हाला काय अक्षेपार्ह वाटलं नाही. मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय आक्षेपार्ह वाटलं ? सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशित साहित्यात जे प्रसिद्ध केलंय. त्यावर तो सिनेमा निर्माण केला आणि हा इतिहास तुम्ही पुसण्याचा प्रयत्न करता. या विषयावरती अद्याप देवेंद्र फडवणीस का बोलले नाही? आम्ही इतकंच म्हटलेल आहे की फुले चित्रपटाचा जो वाद आहे तो फडणवीसांनी ताबडतोब मिटवायला पाहिजे. ते म्हणतील सेन्सर बोर्ड आहे. सेन्सर बोर्डामध्ये सगळे तुमचेच चमचे बसलेले आहेत. ज्या सेन्सर बोर्डाला कश्मीर फाईल, ताश्कंदन फाईल किंवा केरळ स्टोरीमध्ये काही दिसत नाही त्यांना फुलेंच्या चित्रपटात आक्षेप कसा का वाटतो? त्यांना नामदेव ढसाळ कोण माहित नाही. सेन्सर बोर्डाला नामदेव ढसाळ कोण म्हणून विचारतात, असे सेन्सर बोर्डच्या लोकांना फुले माहित असण्याची शक्यता मला फार कमी वाटते. हा चित्रपट जशाच्या तसा प्रदर्शित व्हावा यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. काळजीपूर्वक अग्रलेख वाचल्याबद्दल मी मी चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो, भारतीय जनता पक्ष माझे अग्रलेख अत्यंत काळजीपूर्वक वाचतो. देवेंद्र फडणवीससुद्धा सामना वाचतात. त्याच्यामुळे त्यांच प्रबोधन झालं याच्याबद्दल मी राज्य सरकारचा आभारी आहे.
मोदी आणि शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही मानतो. जे महाराष्ट्राच्या शत्रूंची उचलेगिरी करतायत चाटूगिरी करतायत त्यांनी असे प्रश्न निर्माण करावेत हे आश्चर्य आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये हिंदी भाषिक शाळा असणं काही गुन्हा नाही. ग्वाल्हेरला मराठी शाळा आहेत, गुजरात मधल्या अनेक भागात मराठी शाळा आहेत. बेळगावात सुद्धा मराठी शाळा आम्ही चालवायचा कसोशीने प्रयत्न करत आहोत. दिल्लीमध्ये आम्ही मराठी शाळा चालवायचा प्रयत्न करत आहोत. हिंदी आणि उर्दू या शाळा का आम्ही सुरू केलेल्या नाहीयेत. या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या शाळा या देशात सुरू आहेत. त्यांनी जरा इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून यांच्या पक्षाची अवस्था माती खाण्यासारखी झाली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.
गुजरात हे उडता गुजरात झाले आहे. आणि हे जगाला ज्ञान शिकवत आहेत. गुजरातच्या राजकारणातून ड्रगचा पैसा देशभरात जातो. नाशिकमध्ये येणारे ड्रगसुद्धा गुजरात मधून येत हे मी वारंवार सांगितलेलं आहे. संपूर्ण देशाला ड्रग्सचा पुरवठा गुजरातच्या भूमीवरून होत आहे. आणि त्यासाठी मोदींचे लाडके उद्योगपतींच्या खासगी पोर्टचा वापर होत आहे असे संजय राऊत म्हणाले.
मोदी हे कधीही इतिहासाचे अभ्यासक नव्हते. मोदींचा स्वातंत्र्य लढाशी कधी संबंध नव्हता. मोदींनी जर एखादं पुस्तक पूर्ण वाचलं असेल तर मला सांगावं. टेलिप्रॉम्प्टरवरची भाषणं वाचणं म्हणजे इतिहास नाही. स्वतः पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकर यांना कायदेमंत्री म्हणून आमंत्रित केलं होत आणि घटना समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना काँग्रेस पक्षान आमंत्रित केलं होतं. इतकच नव्हे जेव्हा त्यांचा पराभव झाला, घटना समितीत त्यांना आणण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांना मुंबईतून जयकरांनी राजीनामा दिला आणि त्यांना त्या समितीवरती आणलं. भाजपच्या लोकांना इतिहास माहित नाही. आणि या लोकांना रेटून खोटं ऐकण्याची सवय लावलेली आहे असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List