Dr Babasaheb Ambedkar Jayanti – डॉ. आंबेडकर स्मारकाचे 80 टक्के काम पूर्ण

Dr Babasaheb Ambedkar Jayanti – डॉ. आंबेडकर स्मारकाचे 80 टक्के काम पूर्ण

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या पूर्णत्वासाठी आणखी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू असून जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीए आयुक्तांनी नुकतीच या स्मारकाच्या कामाची पाहणी करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे पुढच्या वर्षी बाबासाहेबांच्या अनुयायांना इंदू मिल येथील स्मारकात अभिवादन करता येणार आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात, मात्र इंदू मिल येथील स्मारकाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने अनुयायी चैत्यभूमी येथूनच परततात. राज्य सरकारच्या एमएमआरडीएमार्फत इंदू मिलच्या 12 एकर जागेवर भव्य स्मारक बांधण्यात येत असून या प्रकल्पाच्या कामाला 2018 साली सुरुवात करण्यात आली. 36 महिन्यांत म्हणजेच 2021 मध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते, मात्र 2025 साल उजाडले तरीदेखील स्मारक बांधून पूर्ण झालेले नाही. आता मात्र स्मारकाचे काम जलदगतीने सुरू असून मे 2026 मध्ये स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विकम कुमार यांनी नुकतीच इंदू मिल येथील स्मारकाला भेट देऊन प्रकल्पाचा आढावा घेतला.

कामाची प्रगती टक्के

  • डबल बेसमेंट पार्किंग 95
  • प्रवेश प्रांगण 88.5
  • व्याख्यानगृह 78.75
  • ग्रंथालय 81
  • प्रदर्शन व प्रेक्षागृह 68
  • पदपथ इमारत 52.8
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री
चित्रपटांप्रमाणेच चित्रपटातील कलाकारांच्या कथाही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नसतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याविषयी सांगणार आहोत. ज्याने आपल्या मामाच्या मुलीशी...
संतोष देशमुखचा खून पचला नाही तसंच सिंधुदुर्गातही होईल – संजय राऊत
म्यानमार आणि तिबेटनंतर नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Solapur News – गरिबांचा विठोबा होतोय कोट्यधीश, चैत्री यात्रेत 2 कोटी 56 लाखाचे उत्पन्न
जागतिक स्तरावर भूगर्भात नरेंद्र मोदींविरोधात हालचाली सुरू आहेत म्हणूनच… – संजय राऊत
Photo – कोरड पडली मुंबईकरांच्या घशाला, लाज नाही प्रशासनाला; शिवसैनिकांचा हंडा मोर्चा
अमिताभ बच्चन यांना सतावतेय ही गोष्ट, अखेर हार मानली; निराश होऊन सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली