ट्रम्प आणि मस्क दिसले बूट शिवताना, टेरीफवरून चीनने एक्सवर उडवली खिल्ली

ट्रम्प आणि मस्क दिसले बूट शिवताना, टेरीफवरून चीनने एक्सवर उडवली खिल्ली

चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्ध दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. अतिरिक्त आयात शुल्कावरून दोन्ही देशांमध्ये चढाओढ सुरू असून चीनने आता युरोपियन महासंघाला साकडे घातले आहे. ट्रम्प यांच्या व्यापार धोरणावरून चिनी जनतेमध्येही असंतोष असून ट्रम्प आणि मस्क यांच्यावरून अनेक मीम्स सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात येत आहेत. ट्रम आणि मस्क आजूबाजूला बसून बूट शिवतानाचे तर विविध प्रसिद्ध व्यक्ती कुणी आयफोन असेंबल करताना तर कुणी आणखी काहीतरी करताना दिसत आहेत. एआयच्या मदतीने अशा प्रकारची मीम्स एक्सवरून पसरवली जात असल्याचे समोर आले आहे.

हाँगकाँग येथील फिनिक्स टीव्हीने शेअर केलेल्या व्हिडियोत ट्रम्प आणि एलन मस्क नीक या बूट बनवणाऱ्या अमेरिकेतील फॅक्ट्ररीत काम करताना दिसत आहेत. दोघेही बूट शिवताना दाखवण्यात आले आहेत. आणखी एका व्हिडिओत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस लाल टोपी आणि डेनिमचे शर्ट घालून आयफोन असेंबल करताना दाखवण्यात आले आहेत.

चीनचे परराष्ट्र मंत्रीही उतरले मैदानात

हा व्हिडियो सोशल मीडियावर केवळ चिनी नागरिकच नाही तर सरकारमधील बडी मंडळीही शेअर करताना दिसत आहेत. चीन सरकारी मीडिया आणि अधिकाऱ्यांनीही आपल्या एक्स हँडलवरून असे अनेक व्हिडिओ व्हायरल केले आहेत. चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माओ निंग यांनी एक्सवरून एक मीम पोस्ट केले आहे. यात ट्रम्प यांची स्वतःची मेक अमेरिका ग्रेट अगेन कॅपची किंमत अतिरिक्त आयात शुल्कामुळे 50 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर चीनच्या वाणिज्य दूतावासाचे प्रवत्ते लियू पेंग्यू यांनी एक मीम शेअर केले आहे. यात रेडनोट अ‍ॅपवर दाखवण्यात आले आहे की, मेक अमेरिका ग्रेट अगेन ही राजकीय घोषणा असून ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत या घोषणेचा प्रामुख्याने वापर केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री
चित्रपटांप्रमाणेच चित्रपटातील कलाकारांच्या कथाही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नसतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याविषयी सांगणार आहोत. ज्याने आपल्या मामाच्या मुलीशी...
संतोष देशमुखचा खून पचला नाही तसंच सिंधुदुर्गातही होईल – संजय राऊत
म्यानमार आणि तिबेटनंतर नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Solapur News – गरिबांचा विठोबा होतोय कोट्यधीश, चैत्री यात्रेत 2 कोटी 56 लाखाचे उत्पन्न
जागतिक स्तरावर भूगर्भात नरेंद्र मोदींविरोधात हालचाली सुरू आहेत म्हणूनच… – संजय राऊत
Photo – कोरड पडली मुंबईकरांच्या घशाला, लाज नाही प्रशासनाला; शिवसैनिकांचा हंडा मोर्चा
अमिताभ बच्चन यांना सतावतेय ही गोष्ट, अखेर हार मानली; निराश होऊन सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली