वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालनंतर आसाममध्ये हिंसाचार, दगडफेकीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालनंतर आसाममध्ये हिंसाचार, दगडफेकीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादनंतर आज आसाममध्येही विविध ठिकाणी हिंसाचार उफाळून आला. कछर जिल्ह्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. सिलचर शहरातील परिस्थिती चिघळू नये म्हणून आणि जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या झटापटीत काही पोलीस आणि नागरिकही जखमी झाले.

सिलचरमध्ये चामरागुडा, बेरेंगा आणि ओल्ड लखीपूर येथे आंदोलकांनी वक्फ कायद्याविरोधात आज सकाळी रॅली काढली. आंदोलनकर्त्यांनी वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करणारे फलक हाती घेतले होते. कायदा इस्लामविरोधी असून जर तो रद्द केला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

हिंसाचाराला भाजप जबाबदार

वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार उफाळून आला. यात तिघांचा मृत्यू झाला. या हिंसाचाराला भाजप जबाबदार आहे.  वक्फ सुधारणा कायदा आम्ही नाही पेंद्र सरकारने बनवला. त्यामुळेच देशभरात त्याला कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना पेंद्र सरकारनेच उत्तर द्यायला हवे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. वक्फ कायदा कुठल्याही स्थितीत पश्चिम बंगालमध्ये लागू होऊ देणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

वक्फ कायद्यांतर्गत पहिली कारवाई; मध्य प्रदेशात अनधिकृत मशिदीवर हातोडा

वक्फ सुधारणा कायदा देशभरात लागू झाल्यानंतर या कायद्यांतर्गत मध्य प्रदेशच्या पन्नू जिह्यात अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यात आली. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी अखेर मदरशाच्या संचालकांनीच मशिदीवर स्वतःहून बुलडोझर चालवत मशीद पाडून टाकली. पन्ना जिह्यातील बीड कॉलनी येथे सरकारच्या जागेवर गेल्या 30 वर्षांपासून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता हा मदरसा सुरू होता अशी तक्रार राज्य सरकारकडे करण्यात आली होती. एका स्थानिक मुस्लिम रहिवाशाने केलेल्या तक्रारीनंतर यंत्रणांनी या मदरशाची दखल घेतली होती.

मुर्शिदाबादमधील हिंसाचारप्रकरणी आणखी 12 जणांना अटक

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्यावरून झालेल्या हिंसक निदर्शनांच्या संदर्भात आज आणखी 12 जणांना अटक करण्यात आली. हिंसाचार उफाळल्यामुळे तीन जणांना जीव गमवावा लागला. आज मुस्लिमबहुल जिह्यात तणावपूर्ण शांतता होती, कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हिंसाचारामुळे मुर्शिदाबादच्या धुलियान येथील जवळपास 500 लोकांनी इतरत्र स्थलांतर केले. सर्वांनी नदी पार करून माल्दाच्या वैष्णवनगर येथील एका शाळेत आसरा घेतल्याचे वृत्त आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…” मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही...
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज
मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री