एमएमआरडीएविरोधात शिवसेनेचे उद्या साखळी उपोषण; शिवडी, परळ नाक्यावर होणार आंदोलन
एमएमआरडीएच्या शिवडी-वरळी उन्नत मार्गातील प्रकल्पातील विविध समस्या व स्थानिकांच्या न्याय्य हक्क तसेच सुविधांसाठी सरकारचे व एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता मंगळवार, 15 एप्रिलला शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघ व स्थानिकांच्या वतीने एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
मुंबईचा विकास करण्याचा दावा करणाऱया महायुतीकडून विविध विकास प्रकल्प हाती घेण्यात आले असले तरी ते प्रकल्प पूर्ण करताना प्रकल्पग्रस्त तसेच स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेतल्यामुळे गैरसमज निर्माण होत असतात. एमएमआरडीएने हाती घेतलेल्या शिवडी-वरळी उन्नत मार्गातील प्रकल्पातील विविध समस्या व स्थानिकांचे प्रश्न अजूनही सोडवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महायुती सरकारविरोधात स्थानिकांमध्ये मोठा असंतोष आहे. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंगळवारी, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिवडी नाका येथील राष्ट्रीय हॉटेलसमोर आणि परळ नाका येथील गौरीशंकर मिठाईवालासमोर आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List