नराधम विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या, कल्याणमधील चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरण

नराधम विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या, कल्याणमधील चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरण

कल्याणमधील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा नराधम विशाल गवळी (30) याने तळोजा कारागृहात आज आत्महत्या केली. पहाटे चार वाजता गवळीने शौचालयात टॉवेलने गळफास घेतल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली. गवळीच्या मृत्यूची माहिती कल्याणमध्ये धडकताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी ‘क्रूरकर्मा संपला, परमेश्वराने आम्हाला न्याय दिला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, गवळीचे वकील संजय धनके यांनी या आत्महत्येविषयी शंका व्यक्त केली आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा ज्याप्रकारे एन्काउंटर केला त्याचप्रमाणे विशाल गवळीला पोलिसांनी संपवले असल्याचा आरोप केला आहे.

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात 23 डिसेंबर 2024 रोजी कुख्यात गुन्हेगार विशाल गवळी याने एका 13 वर्षीय चिमुकलीचे अपहरण केले होते. तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केल्यानंतर निर्घृण हत्या केली. या हत्याकांडात त्याची पत्नी साक्षीचाही सहभाग होता. पत्नीच्या मदतीने मुलीचा मृतदेह कल्याण-भिवंडी मार्गावरील बापगाव हद्दीत फेकून दिला. त्यानंतर विशाल हा साक्षीचे माहेर असलेल्या शेगावला पळाला. मात्र दुसऱयाच दिवशी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेगाव येथे त्याला बेडय़ा ठोकल्या होत्या. चिमुकलीच्या हत्येनंतर कल्याण, डोंबिवलीत विविध संघटनांनी संताप व्यक्त करत मोर्चे काढले होते.

नागरिकांचा रोष लक्षात घेता राज्य सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे जाहीर करून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. तर सुरक्षेच्या दृष्टीने गवळी आणि त्याच्या पत्नीला तळोजा जेलमध्ये हलवले होते. मात्र आज पहाटे त्याने जेलमध्येच आत्महत्या केली. तळोजा तुरुंग प्रशासनाने गवळीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली मृतदेह केला जाणार आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच भेट

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 60 दिवसांच्या आत कल्याणच्या जलदगती न्यायालयात गवळीविरोधात दोषारोपपत्रही दाखल केले. पुढील आठवडय़ात या खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच नराधम विशाल गवळीने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच गवळीची भेट घेऊन खटल्यासंदर्भात चर्चा केल्याचे त्याचे वकील संजय धनके यांनी सांगितले. तो आत्महत्या करेल असे वाटले नव्हते. पोलिसांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रमाणे विशालची हत्या केल्याचा त्यांनी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…” मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही...
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज
मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री