नाहीतर तुरुंगात जाण्यासाठी तयार राहा! परदेशी नागरिकांना ट्रम्प प्रशासनाचा इशारा
अमेरिकेत 30 दिवसांहून अधिक काळ अवैध वास्तव्यास असलेल्या सर्व विदेशी नागरिकांना त्यांची नोंदणी करावी लागणार आहे. यात कसूर करणाऱयांना दंड किंवा कारावास भोगावा लागू शकतो. व्हाईट हाऊसने याबाबचे नियम लागू केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प दुसऱयांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेत अवैधरित्या राहाणाऱयांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात ढाली. आता पुन्हा ट्रम्प प्रशासन आक्रमक झाले आहे. होमलँड सिक्युरिटी विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत.
दरम्यान, वॉल्टर रीड मिलिट्री रुग्णालयात कार्डियो आणि कॉग्निटिव्ह अशा दोन प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्यानंतर 78 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांनी माझे हृदय एकदम निरोगी असून प्रत्येक प्रश्नाचे मी योग्य उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
परदेशी गुंतवणूकदारांनी काढले 31 हजार कोटी रुपये
अमेरिकेने हिंदुस्थानवरील 26 टक्क्यांचे अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याला 90 दिवसांची स्थगिती दिली असली तरीही अमेरिकेच्या विविध देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याच्या घोषणेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानच्या शेअर बाजारातून तब्बल 31 हजार 575 कोटी रुपये काढून घेतल्याचे समोर आले आहे. 21 मार्च ते 28 मार्च यादरम्यान सहा कामकाज सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी अस्थित बाजारामुळे आणि अमेरिकन धोरणाच्या धास्तीने 30 हजार 927 कोटी रुपये काढून घेतले.
चीनने ट्रम्प यांना रेसिप्रोकल टेरीफ रद्द करण्याची केली विनंती
वाघाच्या गळ्यात ज्याने घंटी बांधली तोच ती काढू शकतो, असे म्हणत चीनने एमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रेसिप्रोकल टेरीफ म्हणजेच जशास तसे आयात शुल्क रद्द करण्याची विनंती केली आहे. आपल्या चुका सुधारण्यासाठी अमेरिकेने मोठे पाऊल उचलावे. आयात शुल्क लादण्याची प्रथा संपवून टाकावी आणि आपल्या मार्गावर परतावे, असे आवाहन चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List