संकट परतवून लावण्यासाठी वज्रमूठ दाखवा, उद्धव ठाकरे गरजले

संकट परतवून लावण्यासाठी वज्रमूठ दाखवा, उद्धव ठाकरे गरजले

शिवसेनेसह मुंबई-महाराष्ट्रावर आणि मराठी अस्मितेवर घोंगावणारे संकट परतवून लावण्यासाठी एकजुटीची पोलादी वज्रमूठ बनवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तमाम शिवसैनिकांना केले.

दक्षिण मुंबईचे लोकसभा संघटक सुधीर साळवी यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज साळवी यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत लालबाग, परळ, वरळी परिसरातील शेकडो शिवसैनिक होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

लालबाग, परळ, वरळी म्हणजे कट्टर शिवसैनिक आलाच. सुधीर साळवी हेसुद्धा लालबागचेच आहेत. त्यांच्यावर शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. साळवी यांची सचिवपदी नियुक्ती करताच, ‘उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी’ अशा बातम्या आल्या. पण शिवसेनेचे लक्ष्य आता मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे आणि त्यासाठीच साळवी यांना सचिव पद दिले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सुधीर साळवी यांना आता मी पक्षकार्यासाठी मुंबईत पळवणार आहे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, आमदार अजय चौधरी, वरुण सरदेसाई, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, सचिन पडवळ आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…” मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही...
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज
मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री