पठाणी कुर्ता-सलवार,सलमान खानचा ईदचा खास लूक; चाहत्यांना भेटण्यासाठी आला घराच्या बाल्कनीत
आज म्हणजे 31 मार्च रोजी सर्वत्र ईदचा सण साजरा होत आहे. सामान्यांप्रमाणे अनेक सेलिब्रिटीही ईद साजरा करताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.चाहते वाट पाहत होते ते सलमान खानच्या एका झलकची. आणि चाहत्यांची ही इच्छाही पूर्ण झाली आहे. सलमान खानने चाहत्यांना अखेर ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना दाखवली एक झलक
सलमान खानने नेहमीप्रमाणे त्याच्या घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना त्याची झलक दाखवली आहे. यावेळी नक्कीच सलमान खानच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. बुलेटप्रूफ काचेच्या मागे उभे राहून सलमानने त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे स्वागत केले.
सलमान खानभोवतीची सुरक्षा
लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तथापि, यानंतरही, सलमान ईदच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सलमानने त्याच्या बुलेटप्रूफ बाल्कनीतून लोकांना हात दाखवून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याने पांढरा पठाणी कुर्ता आणि सलवार घातला होता, ज्यामध्ये तो खूप सुंदर दिसत होता.
चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा मिळाल्या
सलमान खानसोबत त्याची बहीण अर्पिता खानची दोन्ही मुले अहिल शर्मा आणि आयत शर्मा देखील सलमान खानसोबत यावेळी उपस्थित होते. यावेळी, आहिलनेही पांढरा कुर्ता-पायजमा घातला होता आणि आयतने एक सुंदर शरारा घातला होता. ईदच्या निमित्ताने सलमान खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी त्याच्या घराबाहेर म्हणजे गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर बराच वेळ जमली होती.
सलमान खान आणि चाहत्यांमध्ये होती बुलेटप्रूफ काच
अभिनेत्याच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. याआधी, इतर वर्षी ईदच्या दिवशी, सलमान गॅलेक्सीच्या बाल्कनीतून लोकांना शुभेच्छा देत असे. पण, यावेळी त्याच्या आणि त्याच्या चाहत्यांमध्ये फक्त बुलेटप्रूफ काच आहे. दरम्यान सलमान खानने त्याच्या चाहत्यांना ईदच्या आधीच एक गिफ्ट दिलं आहे. ते म्हणजे त्याचा चित्रपट ‘सिकंदर’. चाहते त्याच्या या चित्रपटाची फार आतुरतेनं वाट पाहत होते. 30 मार्च रोजी थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज झाला आहे. आणि प्रेक्षांची पसंतीही मिळत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List