विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिरेकी, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे विधान

विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिरेकी, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे विधान

विधेयके रोखून धरण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच अतिरेकी असल्याचे म्हटले आहे. विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राज्यपालांना संविधानात कोणतीही मर्यादा नसल्याचा दावाही त्यांनी केला असून जर न्यायालयाने संविधानात सुधारणा केली तर संसद आणि विधानसभेची भूमिका काय असेल, असा उलट सवालही केला आहे. त्यामुळे आता यावर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिरेकी असल्याचे सांगतानाच न्यायालय आपल्या मर्यादा ओलांडत असून कार्यकारी आणि कायदेमंडळात हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही आर्लेकर यांनी केला आहे. न्यायालयाने तीन महिन्यांची मर्यादा घालणे म्हणजे न्यायालयाकडून घटना दुरुस्ती करण्यासारखेच आहे. दोन न्यायाधीश संविधानाचे स्वरूप बदलू शकत नाहीत. न्याय व्यवस्थापन वर्षानुवर्षे अनेक खटले प्रलंबित ठेवते. हे लक्षात घेता राज्यपालांकडेही विधेयके प्रलंबित ठेवण्याची कारणे असू शकतात अशी भूमिका आर्लेकर यांनी मांडली आहे.

विधेयके प्रलंबित नसल्याचा दावा

केरळ राजभवनात कोणतेही विधेयक प्रलंबित नसून काही विधेयके राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आल्याचा दावाही केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केला आहे. दरम्यान, केरळ सरकारने राज्यपालांकडून  विधेयके रोखून धरत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी आता 13 मे रोजी सुनावणी होणार आहे.

राष्ट्रपतींसाठी तीन महिन्यांची कालमर्यादा

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींना महिन्यांच्या आत विधेयकांवर निर्णय घ्यावा लागेल असे म्हटले आहे, तर 8 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने तामीळनाडू सरकार आणि राज्यपालांच्या प्रकरणात एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. विधानसभेने पाठवलेल्या विधेयकांवर राज्यपालांना एक महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागेल असे म्हटले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…” मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही...
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज
मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री