रेखा अमिताभ नाही तर या अभिनेत्याच्या प्रचंड प्रेमात होत्या ; गर्लफ्रेंडने पकडलं होतं रंगेहाथ

रेखा अमिताभ नाही तर या अभिनेत्याच्या प्रचंड प्रेमात होत्या ; गर्लफ्रेंडने पकडलं होतं रंगेहाथ

बॉलिवूडची एव्हरग्रीन ॲक्ट्रेस म्हणून ओळख असेलेली अभिनेत्री म्हणजे रेखा. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रेखाचे सौंदर्य आणि त्यांच्या अदा आजही अनेकांना घायाळ करतात. आता जरी त्या चित्रपटांपासून दूर असल्या तरीही त्यांच्या मात्र चर्चा कायम असतात. रेखा चित्रपटांप्रमाणेच त्यांच्याो खाजगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. रेखा यांचे नाव फक्त अमिताभ बच्चन यांच्या योबतच जोडले आहे असं नाही तर त्यांचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. त्यात अमिताभ आणि रेखा यांचे प्रेमप्रकरण माहित नाही असा क्वचितच कोणी व्यक्ती असेल.

रेखा केवळ अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात नव्हत्या तर त्यांचे अनेक अभिनेत्यांसोबत अफेअर्स होते.

रेखा बॉलिवूडच्या वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. रेखा केवळ अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात नव्हत्या तर त्यांचे अनेक अभिनेत्यांसोबत अफेअर्स होते. पण त्यातील एका अभिनत्याचे नाव हे जास्तच चर्चेत राहिलं ते म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार. तसे पाहायला गेलं तर अक्षय कुमारचे नाव इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले.पण या यादीतील रेखा यांचं नाव हे खरोखरच आश्चर्यचकित करणार आहे.

रेखा अक्षयच्या प्रचंड प्रेमात होत्या 

एक काळ असा होता जेव्हा रेखा आणि अक्षयचे नावे जोडले गेले होते. रेखा अक्षय कुमारपेक्षा 13 वर्षांनी मोठ्या आहेत. रेखा अक्षयच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी अक्षय कुमाररवीना टंडनसोबत रिलेशनशीपमध्ये होता. 1996 मध्ये जेव्हा अक्षय कुमार, रेखा आणि रवीना टंडन यांचा खिलाडी का खिलाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय आणि रेखा यांचे अनेक इंटिमेट सीन्स होते, जे चर्चेत आले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा यांचा अक्षयकडे असलेला कल दिसून आला.

रवीनाने अक्षय कुमार आणि रेखा यांना रंगेहाथ पकडलं होतं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा अक्षयला पसंत करू लागल्या होत्या. त्या अक्षयच्या प्रेमात एवढ्या वेड्या झाल्या होत्या की त्या अक्षयसाठी घरून जेवणही आणायच्या. त्यावेळी अक्षय आणि रवीना एकमेकांना डेट करत होते. रवीना आणि अक्षय यांचा साखरपुडा झाला होता असंही म्हटलं जातं. एवढंच नाही तर रवीनाने अक्षय कुमार आणि रेखा यांना रंगेहाथ पकडलं होतं असही म्हटलं जातं. रवीना आणि अक्षयमध्ये नेहमी रेखावरून वादही झाल्याचं म्हटलं जातं. अखेर अक्षय आणि रवीनाचे टिकले नाही आणि रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by TimesMusic (@timesmusichub)


रवीना टंडनने देखील याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं 

सिनेबिट्सला दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडनने याबद्दल सांगितल देखील होतं की, “जर त्या (रेखा) अभिनेत्रीला माहित होतं की आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहोत आणि त्या अजूनही अक्षयच्या जवळ येत होत्या, तेव्हा मी गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करत होते. मी ते पाहिले होते. त्या त्याच्यासाठी घरून जेवण आणायच्या. पण अक्षयला परिस्थिती कशी हाताळायची हे माहीत होतं.”

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आठ ते नऊ आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू, मालाड राडाप्रकरणी दोघांना अटक आठ ते नऊ आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू, मालाड राडाप्रकरणी दोघांना अटक
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत राडा प्रकरणी दोघांना कुरार पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. आठ...
रेसिप्रोकल टेरिफच्या टेन्शनमुळे शेअर बाजारात भूकंप
सीबीएसईप्रमाणे भौतिक सुविधा, मनुष्यबळही पुरविणार का? ज. मो. अभ्यंकर यांचा प्रश्न
IPL 2025 – 27 करोड पाण्यात; ऋषभ पंतच्या लखनऊचा पराभव, पंजाबने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी
राज्यातील या शहरांमध्ये धावणार बाईक टॅक्सी, मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय
कल्याण डोंबिवलीत एप्रिल फुलवरून राजकीय वाद पेटला, मनसेचे सत्ताधाऱ्यांना झोंबणारे बॅनर, शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर
Waqf Amendment Bill – चर्चेत सहभागी होणार आणि विधेयकाविरोधात मतदान करणार; इंडिया आघाडीची बैठकीत वज्रमूठ