मराठी वाचा, बोला, लिहा… शिवसह्याद्री फाउंडेशनने केला मायमराठीचा जागर

मराठी वाचा, बोला, लिहा… शिवसह्याद्री फाउंडेशनने केला मायमराठीचा जागर

वरळी येथे शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीने ‘आम्ही वरळीकर’ संकल्पनेतून भव्य गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. परंपरागत वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, लेझिम पथक, ऐतिहासिक देखावे आणि रामायणातील प्रसंगांचे चित्ररथ यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. शोभायात्रेत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  सहभागी झाले.

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याच्या  गौरवस्मृतीसाठी विद्यार्थी आणि महिलांना मराठी पुस्तके भेट देण्यात आली, तसेच स्थानिक लेखक, कवी, पत्रकारांचा विशेष सन्मान झाला. ‘मराठी वाचा, बोला, लिहा’ हा संदेश देण्यासाठी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांचे फलक सादर केले.

जांबोरी मैदान ते डॉ. जी. एम. भोसले मार्ग येथे सोहळा दिमाखात पार पडला. आमदार, खासदार आणि मराठी सिनेकलाकारांच्या उपस्थितीने शोभा वाढली. आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै सहपत्निक उपस्थित होते शिवसह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कदम यांनी मराठी संस्कृतीचा अभिमान वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार मानले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, अजय चौधरी, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर विभाग प्रमुख आशीष चेंबुरकर, अरविंद भोसले, मराठी सिने कलाकार संजय खापरे, सचिन देशपांडे, अर्षद अटकरी, श्रद्धा मांगले, दिपाली चौगुले, शृतीका भोसले, वैभव चव्हाण, शिवसह्याद्री फाउंडेशनचे महेश खावणेकर, दत्ता भोसले, प्रकाश नारकर, विनायक चौधरी, महेंद्र चव्हाण, सुजाता सावंत आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – 27 करोड पाण्यात; ऋषभ पंतच्या लखनऊचा पराभव, पंजाबने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी IPL 2025 – 27 करोड पाण्यात; ऋषभ पंतच्या लखनऊचा पराभव, पंजाबने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी
पंजाब किंग्सने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबने लखनऊचा 8 विकेटने...
राज्यातील या शहरांमध्ये धावणार बाईक टॅक्सी, मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय
कल्याण डोंबिवलीत एप्रिल फुलवरून राजकीय वाद पेटला, मनसेचे सत्ताधाऱ्यांना झोंबणारे बॅनर, शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर
Waqf Amendment Bill – चर्चेत सहभागी होणार आणि विधेयकाविरोधात मतदान करणार; इंडिया आघाडीची बैठकीत वज्रमूठ
चंद्रपूर शहरात खड्ड्यांनी प्रदूषण वाढविले, मार्च महिना ठरला सर्वाधिक प्रदूषित
आधी पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत लग्न लावले, नंतर पश्चाताप झाल्यावर पतीचे धक्कादायक कृत्य
मित्राला भेटायला आलेल्या जर्मन महिलेवर कॅबचालकाने केला बलात्कार, हैदराबादमध्ये घडली धक्कादायक घटना