रात्री अचानक कान दुखतोय? मग हा घरगुती उपाय करा, चुटकीत आराम मिळवा!

रात्री अचानक कान दुखतोय? मग हा घरगुती उपाय करा, चुटकीत आराम मिळवा!

असं समजा रात्रीची वेळ आहे, सगळं घर शांत झोपलंय आणि एवढ्यात घरातल्या एखाद्या लहानग्याच्या कानात दुखायला लागतं. मग काय, सगळ्यांची धावपळ सुरू होते. आई-बाबांना काळजी वाटते, आजी-आजोबांची नजर देवघराकडे जाते आणि घरात भीतीचं वातावरण तयार होतं.

पण अशा वेळी घाबरण्याची गरज नाही, कारण या त्रासावर उपाय फार दूर नाही—तो आहे तुमच्या स्वयंपाकघरातच!

घरगुती उपाय फायदेशीर

कानदुखी ही सामान्य समस्या आहे. पण योग्य वेळी उपाय केल्यास लगेच आराम मिळतो. आणि गंमत म्हणजे यासाठी खास औषधांची गरज नसते. आपल्या घरात असलेल्या वस्तू वापरूनही इलाज शक्य आहे, असं डॉक्टर सांगतात.

लसूण आणि मोहरीचं तेल रामबाण

मोहरीचं तेल आणि लसूण ही दोन्ही आयुर्वेदात उष्ण गुणधर्मासाठी ओळखली जातात. हे पदार्थ कानदुखी कमी करण्यात उपयोगी ठरतात. विशेषतः खेडेगावात, जिथे रात्री डॉक्टर किंवा दवाखाना सहज मिळत नाही, तिथे हा उपाय खूपच उपयुक्त आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

उपाय कसा करायचा?

दोन-तीन लसणाच्या पाकळ्या घ्या.

त्या मोहरीच्या तेलात टाका आणि मंद आचेवर गरम करा.

लसूण जरा लालसरसर होईपर्यंत तेल तापू द्या.

मग हे तेल थोडं थंड करून कोमट झाल्यावर कानात दोन-तीन थेंब टाका.

पाच मिनिटं थांबा. जर आराम मिळत नसेल, तर हा उपाय दिवसातून दोन-तीन वेळा करा.

हा उपाय करताना काळजीपूर्वक आणि स्वच्छता पाळणं गरजेचं आहे. विशेषतः लहान मुलांसाठी करत असाल, तर अधिक दक्षता घ्या.

कानदुखीचं मूळ कारण ओळखा

कानात दुखत असेल, तर सर्वात आधी हे तपासा की आत काही किडा तर शिरलेला नाही ना? जर तसं काही नसेल आणि तरीही दुखत असेल, तर घरगुती उपाय वापरायला हरकत नाही, असं डॉक्टर सांगतात.

पूर्वीचे ज्ञान आजही उपयोगी

आपल्या पूर्वजांनी, ऋषी-मुनींनी, अशा अनेक घरगुती उपायांनी आयुष्य जगलं आहे. आयुर्वेद म्हणजे फक्त जुनी चिकित्सा पद्धत नाही, तर आजही ग्रामीण भागात अनेकांसाठी ती पहिली मदत ठरते.

एक छोटी सावधगिरीही आवश्यक

हा उपाय अनेकांना उपयोगी ठरला असला तरी प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे कानदुखीचा त्रास वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि कोणताही उपाय करताना अति आत्मविश्वास न ठेवता योग्य खबरदारी घ्या.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सूरज चव्हाणला चित्रपटातील रोल झेपेल का? मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष सूरज चव्हाणला चित्रपटातील रोल झेपेल का? मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
‘बिग बॉस मराठीचा ५’ चा विजेता सूरज चव्हाण हा लवकरच ‘झापूक झुपूक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे...
पूर्व द्रुतगती महामार्गावर कचरा वाहून नेणारा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू; दोन जखमी
प्रेमप्रकरणाच्या संशयातून जोडप्यातील भांडण टोकाला गेले, संतापलेल्या पतीने 9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवले
गुन्हेगारीचा प्रवास दाऊद इब्राहिमपासून आता बीडला पोहोचला, म्हणजे राजकारणापर्यंत पोहोचलेला आहे; संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला
Sindhudurg News – तीने जीव दिला नाही…; नवऱ्यासह सासू, सासरे आणि नणंदेवर गुन्हा दाखलं
US Air Strike – येमेनमधील तेल बंदरांवर अमेरिकेकडून हवाई हल्ला, 74 जणांचा मृत्यू; 171 जखमी
ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला