भररस्त्यात चुलीवर भाकरी थापत सरकारविरोधात संताप, गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

भररस्त्यात चुलीवर भाकरी थापत सरकारविरोधात संताप, गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

एकीकडे लाडक्या बहिणीसाठी आपण काहीतरी वेगळे करतो आहोत, हे दाखवायचे आणि गॅस दरवाढीतून गोरगरिबांना लुटायचे. हा नवा धंदा राबविणाऱ्या केंद्र व राज्यातील भाजपा सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. याविरोधात शिवसेनेच्या वतीने पुणे, सांगलीत भररस्त्यात चुली पेटवून त्यावर भाकरी थापत केंद्र व राज्यातील सरकारचा निषेध करण्यात आला.

‘अब की बार महागाई सरकार, महागाईचा झटका लाडक्या बहिणींना फटका,’ अशा जोरदार घोषणा देत पुण्यात कसबा पेठेत शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसैनिक महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर भाकरी थापल्या. गॅस दरवाढीविरोधात शिवसैनिकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. यावेळी आंदोलनाला गजानन थरकुडे, रामभाऊ पारीख, उपशहर प्रमुख आबा निकम, उमेश वाघ, शहर संघटक राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, मकरंद पेठकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, निवडणूक समन्वयक निकिता मारटकर, विद्या होडे, विभागप्रमुख मुकुंद चव्हाण, चंदन साळुंके यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना सांगली जिह्याच्या वतीने केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबरोबरच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडीने सिलिंडर हातात घेऊन निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर रस्त्यावर चुली मांडून त्यावर भाकरी थापत केंद्र व राज्य सरकारचा जोरदार निषेध केला. एकीकडे लाडक्या बहिणीला पैशाचे गाजर दाखवून दुसऱ्या बाजूने तिची लुटमार करण्याचा हा धंदा आहे, असा हल्लाबोल महिला आघाडीने केला. यावेळी आंदोलकांच्या हाती ‘लाडक्या बहिणींना भावांकडून गॅस दरवाढीची भेट’, असे फलक घेण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे, शहरप्रमुख रुपेश मोकाशी, विराज बुटाले यांनी केले.

गॅस सिलिंडरची महाराणी गेली कुठे?

महागाईची झळ आज गोरगरीब, सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे एकेकाळी 10 रुपये गॅस वाढला की केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर बसणारी भाजप नेता स्मृती इराणी यांचे आंदोलनाचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आले होते. भाजपची इराणी तुझी स्मृती गेली कुठे? सिलिंडरची महाराणी गेली कुठे, असा प्रश्न आंदोलकांनी यावेळी विचारला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऋषिकेशमध्ये राफ्टिंग करताना बोट उलटली, एका पर्यटकाचा बुडून मृत्यू ऋषिकेशमध्ये राफ्टिंग करताना बोट उलटली, एका पर्यटकाचा बुडून मृत्यू
उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये गंगा नदीत राफ्टिंग करताना बोट उलटल्याने एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सागर नेगी असे...
आम्ही विकास विरोधी नाही, पण महाराष्ट्राचा विनाश होऊ देणार नाही! लाखो झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरे यांचा खणखणीत इशारा
बीयर बॉटल अन् बॉयफ्रेंड; ‘काम झालं’ अल्पवयीन पत्नीने नवऱ्याला 36 वेळा भोसकलं
आपण रोज वापरत असलेला टूथब्रश किती दिवसांनी बदलायला हवा! वाचा सविस्तर
Photo – समुद्रकिनारी भाग्यश्री मिलिंदच्या दिलखेच अदा
उन्हाळ्यात किचनमध्ये झुरळांची संख्या वाढलीय! फक्त 5 रुपये करा खर्च, झुरळे पळतील कायमची दूर
Meerut Murder Case – पत्नीने पकडले हात तर, प्रियकराने आवळला गळा; विवाहबाह्य प्रेमसंबंधातून घडली हत्या