चहल आणि RJ माहवाशचं रिलेशन Confirm? दोघांनी फोटो केले शेअर
पंजाब किंग्जचा जबरदस्त गोलंदाज युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यापूर्वी कोरिओग्राफर आणि अभिनेत्री धनश्रीसोबत घटस्फोटाच्या अनेक बातम्या आल्या. यानंतर तो आरजे माहवाश हिला डेट करत असल्याच्या अफवानांही पेव फुटले. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. याचदरम्यान माहवाशने युजवेंद्रसोबत एक सेल्फी तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चहल आणि माहवाशच्या रिलेशनच्या चर्चा रंगत आहेत.
मंगळवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना पाहण्यासाठी माहवाश मुल्लानपूर स्टेडियममध्ये पोहोचली होती. यावेळी स्टेडीयमवरील काही फोटो तिने शेअर केले. माहवाशने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चहल, आम्ही सर्वजण प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे तुझ्यासोबत आहोत. आम्ही सर्व तुमच्यासाठी इथे आहोत. असं कॅप्शनही तिने दिले आहे. चहलने माहवाशची ही पोस्टही शेअर केली. आणि त्याने ‘तू मेरे क्रिकेट का छक्का’ हे गाणे देखील लावले आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये चहल आणि माहवाश सेल्फी काढताना दिसत आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
आरजे माहवाशने केला डेटिंग लाईफवर खुलासा
दरम्यान, अलिकडच्या एका मुलाखतीत आरजे माहवाशने तिच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य केलं होतं. माहवाशने एका पॉडकास्ट दरम्यान कॅज्युअल डेटिंगवर तिचा विश्वास नसल्याचे स्पष्ट केले. मी अशी व्यक्ती आहे जर मला त्या मुलासोबत लग्न करायचे असेल तरच मी त्याला डेट करेन. मी कधीच कॅज्युअल डेटवर जात नाही. कारण मी ज्याला डेट करेन त्याच्यासोबतच लग्न करेन. मी धूम चित्रपटातील एका पात्रासारखी आहे, असे ती यावेळी म्हणाली.
माहवाशने तिच्या पास्टबद्दलही काही गोष्टी सांगितल्या. मी 19 वर्षांची असतानाच माझा साखरपुडा झाला होता. यानंतर काही वर्षांमध्येच मी 21 वर्षांची असताना आमचे नाते तुटले. मी अलीगढमध्ये लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे चांगला मुलगा शोधून त्याच्याशी लग्न करणे हेच आमचे ध्येय होते, असेही ती म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List