विवाहित दिग्दर्शकासोबत प्रेमसंबंध, सुष्मिताने ओलांडल्या सर्व मर्यादा, म्हणाली, ‘कोणताही पश्चाताप नाही कारण..’
Love Life: अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आणि आजही खासगी आयुष्यामुळेच चर्चेत असतात. सुष्मिता हिचं नाव जवळपास 10 सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्रीचं कोणत्याच सेलिब्रिटीसोबत नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रिपोर्टनुसार, बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सुष्मिताचं नाव दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती.
सांगायचं झालं तर, 1994 मध्ये मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुष्मिताने महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाचं लेखण विक्रम भट्ट यांनी केलं होतं. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान विक्रम भट्ट आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेम बहरलं, पण तेव्हा विक्रम विवाहित होते. असं असताना देखील सुष्मिता स्वतःला विक्रम यांच्यापासून दूर ठेवू शकली नाही.
विक्रम यांच्यासोबत असलेल्या नात्यावर सुष्मिताने एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सुष्मिता आणि विक्रम यांच्यात सतत वाद व्हायचे. विक्रम कायम महेश यांच्याकडे अभिनेत्रीची तक्रार करायचे. पण अखेर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
दरम्यान विक्रम भट्ट यांना देखील सुष्मिता सोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. यावर विक्रम भट्ट म्हणाले, ‘आमच्यामध्ये प्रेमसंबंध सुरु होण्यापूर्वी मी विवाहित होतो…’ एवढंच नाही तर, सुष्मिताने देखील विक्रम यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं होतं.
अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली, ‘विक्रम आणि त्यांची पत्नी एकत्र राहत नव्हते. जर कोणाचं वैवाहिक आयुष्यात अडचणी असतील त्याला मी काहीही करु शकत नव्हती. मी विक्रमच्या पूर्व पत्नी आणि मुलीबद्दल कधीच वाईट विचार केला नाही. मला कोणत्याच गोष्टीची पश्चाताप नाही… कारण मी काहीही लपून केलेलं नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List