अर्चना पूरण सिंगच्या मुलाने वेटर बनून सर्वांचं मन जिंकलं; नेटकरी म्हणाले “नेपो किड असूनही तो….”

अर्चना पूरण सिंगच्या मुलाने वेटर बनून सर्वांचं मन जिंकलं; नेटकरी म्हणाले “नेपो किड असूनही तो….”

बॉलिवूड अभिनेत्री अर्चना पूरण सिंगने अलीकडेच तिच्या कुटुंबासह पावभाजीचे एक मजेदार आव्हान स्वीकारलं होतं. तिच्या नवीन व्लॉगमध्ये, ती मुंबईत कुटुंबासह नाश्त्यासाठी बाहेर जाताना दिसतेय. तसे अर्चनाचे सर्वच व्लॉग हे नेहमीच गंमतीशीर असतात. नेटकरी नक्कीच तिच्या नव्या व्लॉगची वाट पाहत असतात. हा व्लॉग पाहून नेटकऱ्यांना मजाच आली. पण या व्हिडीओमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतले ते म्हणजे त्यांचा मुलगा आर्यमन याच्या अभिनय कौशल्यानं. ते रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच आणि ऑर्डर देणार असतानाच, आर्यमन वेटर बनतो आणि मेनू वाचायला सुरुवात करतो.

नेटकऱ्यांनीही त्याच्या या कौशल्याचं कौतुक केलं

तो टी-शर्ट घातलेला आणि स्लिंग बॅग घेऊन जाताना दिसला. त्याच्या विनोदी अभिनयाने त्याच्या कुटुंबाला तर हसवलं पण हा व्हिडीओ पाहून इंटरनेटवरही त्याची प्रचंड चर्चा झाली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्याच्या या कौशल्याचं कौतुक केलं आहे. तो एक नेपो किड असूनही इतका साधा आहे याबद्दल त्याचं कौतुक होत आहे.

तो नेपो किड तरीही…

एका युजरने लिहिले आहे की, “त्याच्याकडे एक कला आहे आणि त्याची विनोदबुद्धी देखील खूप चांगली आहे” तर दुसऱ्याने लिहिले आहे, “त्याला त्याच्या आईकडून विनोदाची कला मिळाली”, तर एकाने लिहिले आहे “तो खूप चांगला आहे, त्याला चांगल्या भूमिका मिळायला हव्यात”, तर एका युजरने त्याची इतर नेपोकीडसोबत तुलना करत म्हटलं आहे. “तो चांगला आहे पण त्याचे आईवडील दोघेही अभिनेते आणि कलाकार आहेत म्हणून तो देखील एक नेपो मुलगा आहे. पण तो इतरांपेक्षा चांगला आहे, साधा आहे हे पाहून छान वाटलं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by I am Society (@effortless_gain)


अभिनय पाहून नेटकरी हसू आवरू शकले नाही 

आर्यमनचा अभिनय आणि त्याचं साधं राहणीमान पाहून इंटरनेट वापरकर्ते कौतुकही करतायत आणि त्याचा अभिनय पाहून ते हसू आवरू शकले नाहीत. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून असे दिसून येते की त्याला गायक व्हायचं आहे. त्याने 13 जानेवारी रोजी कबीर हिरानंदानी यांचा पहिला एकल ‘सामा’ प्रदर्शित केला. यानंतर ‘बंजारा’ आणि ‘फॉर यू’ प्रदर्शित झाले. त्याचा सर्वात अलीकडील व्हिडिओ ‘छोटी बातें’ त्याच्या भावाने दिग्दर्शित केला होता.

दरम्यान, अर्चना अलीकडेच करण जोहरच्या ‘नादानियां’ या चित्रपटात दिसली. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. त्याच्या खराब संवाद आणि कलाकारांच्या अभिनयासाठी त्यावर टीका झाली. शौना गौतमचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

 

 


 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी
होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला...
‘डाळ पुरावी म्हणून जास्त पाणी घालायचो…’ शाहरुख खानने सांगितला तो बालपणीचा संघर्ष
“मला अशी पत्नी नको जी..”; अमिताभ बच्चन यांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट, जया यांच्याकडून खुलासा
मुस्लीम पत्नीसाठी हिंदू अभिनेता करतोय रोजा; इस्लामबद्दल म्हणाला “खूप कठीण..”
Katrina Kaif- कतरिना कैफ का गेली पाकिस्तानला? वाचा सविस्तर
आयाराम गयाराम… कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर ते 10व्या अनुसूचीची थट्टा ठरेल! महाराष्ट्रातील राजकारणावर SC ची महत्त्वाची टिप्पणी
स्तन दाबने बलात्कार नाही, ‘या’ निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींना झापले; म्हणाले अत्यंत असंवेदनशील आणि…