Kunal Kamra Controversy: एकनाथ शिंदेंवर कमेंट करण्यासाठी पैसे मिळाले होते का?; कुणाल कामराने दिले उत्तर
कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केली. तेव्हापासून कुणाल कामरा वादात सापडला आहे. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराची या प्रकरणी चौकशी केली आहे. या चौकशीत कुणाल कामराने ‘एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी करण्यासाठी पैसे मिळाले होते का? आणि एकनाथ शिंदे यांची माफी मागणार का?’ या दोन प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली आहे.
कुणाल कामराला मिळाले होते पैसे?
मुंबई पोलिसांनी कुणाल कामराची फोनवरून प्राथमिक चौकशी केल्याचे वृत्त समोर आले आहे. सुपारीच्या प्रश्नावर कुणाल म्हणाला, ‘तुम्ही माझे बँक खाते तपासू शकता. मी सुपारी कशाला घेऊ आणि मराठीतही शो केलेला नाही. मी हिंदीत हा शो केला आहे. मी सुपारी घेतली नाही.’
वाचा: ‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान
कुणाल कामरा माफी मागणार?
जेव्हा पोलिसांनी कुणालला विचारले की त्याला त्याच्या वक्तव्याचा काही पश्चात्ताप होत आहे का? तेव्हा कुणाल म्हणाला, ‘मी हे विधान शुद्धीत दिले आहे आणि मला कोणताही पश्चाताप नाही.’ जेव्हा पोलिसांनी त्याला आपले वक्तव्य मागे घ्यायचे आहे किंवा माफी मागायची आहे का? असे विचारले. तेव्हा कुणालने उत्तर दिले की, ‘जर न्यायालयाने त्याला माफी मागायला सांगितली तर मी माफी मागेन.’
काय आहे वाद?
कुणालच्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये, “जे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीशी केलंय ना, बोलावं लागेल. याठिकाणी त्यांनी आधी काय केलं? आधी शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. मग एनसीपीतून एनसीपी बाहेर आली. एका मतदाराला नऊ बटणं दिली. सर्वजण कन्फ्युज झाले. चालू एकाने केलं, ते मुंबईत खूप मोठा जिल्हा आहे.. ठाणे.. तिथले आहेत,” तो असे विनोदी शैलीत बोलला. यानंतर तो शाहरुख खानच्या ‘भोली सी सुरत.. आँखो में मस्ती’ या गाण्याच्या चालीवर स्वत: बनवलेलं गाणं गाऊ लागतो. एकनाथ शिंदे यांच्यावर त्याने हे गाणं लिहिलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List