‘मंगल’वार! शेअर बाजार सावरला!!
हिंदुस्थानी शेअर बाजारात काल ‘ब्लॅक मंडे’ पाहायला मिळाला, परंतु मंगळवार हा गुंतवणूकदारांसाठी खऱया अर्थाने ‘मंगल’वार ठरला. कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरलेला दिसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने दिवसभरात 1600 अंकांपर्यंत झेप घेतली होती, परंतु सेन्सेक्स दिवसअखेर 1089 अंकांनी वधारून 74,227 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 374 अंकांनी वाढून 22,535 अंकांवर स्थिरावला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 396.67 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सोमवारी मोठय़ा घसरणीनंतर हे मार्केट कॅपिटलायझेशन 389.25 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आली होते. त्यामुळे बीएसईमधील लिस्टेड पंपन्यांचे मार्पेट पॅप आज 7.42 लाख रुपयांनी वाढले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी आज दिवसभरात 7.42 लाख कोटी रुपये कमावले.
बीएसई सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर्सचे वाढीसोबत बंद झाले. यात टायटनचे शेअर्स 3.25 टक्के वाढले. बजाज फायनान्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ऑक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये 2.91 टक्के ते 3.21 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यातील केवळ एक पॉवर ग्रिडचा शेअर किरकोळ घसरणीसह बंद झाला. 4083 शेअर्सपैकी 3092 शेअर वाढीसोबत बंद झाले.
याआधीच्या घसरणीचा इतिहासही जाणून घ्या…
– हिंदुस्थानचा शेअर बाजार व्रॅश होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. शेअर बाजाराच्या घसरणीच्या इतिहासात 1992 साली हर्षद मेहता घोटाळा, 2008 चे जागतिक आर्थिक संकट अशा घटनांचा समावेश आहे. पण त्याआधीही म्हणजे 1865 साली हिंदुस्थानच्या शेअर बाजारात भूपंप आला होता. योगायोगाने या सर्वात मोठय़ा क्रॅशचे कनेक्शनही अमेरिकाच होते. 2025च्या घसरणीमागेही अमेरिकेचाच हात आहे. हासुद्धा योगायोगच म्हणावा लागेल.
– 1865 मध्ये हिंदुस्थानच्या शेअर बाजारातील घसरण अमेरिकन गृहयुद्धादरम्यान झाली. युद्धामुळे अमेरिकेने इंग्लंडला कापसाचा पुरवठा करणे थांबवले. त्यामुळे मुंबईतून मोठय़ा प्रमाणात इंग्लंडला कापूस निर्यात होऊ लागला. कापसाच्या मागणीत वाढ झाल्यामुळे सट्टेबाजीला चालना मिळाली. युद्ध संपल्यानंतर, अमेरिकेने इंग्लंडला कापूस पुरवणे पुन्हा सुरू केले. त्यामुळे इंग्लंडला मुंबईतील कापसावर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही.
– 160 वर्षांपूर्वी बीएसई, एनएसई असे स्टॉक एक्चेंज नव्हते. बँपिंग शेअर, शिपिंग, इन्शुरन्स पंपनी अशा स्वरूपात ट्रेडिंग व्हायचे. या शेअर्सच्या किमती जशा वाढल्या होत्या तशाच धाडकन खाली आल्या. बॅकबे रेक्लेमेशन पंपनीचे शेअर 96 टक्क्यांनी खाली आले. बँक ऑफ बॉम्बेनेही गुंतवणूकदारांचा पैसा बुडवला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List