शेअर बाजाराची पुन्हा घसरण; टॅरिफचे ऑफ्टरशॉक सुरूच
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे सोमवारी जगभरातील शेअर बाजारा भूईसापाट झाले होते. हिंदुस्थानी शेअर बाजारातही सोमवारी प्रचंड घसरण झाली होती. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 5 टक्क्यांची घसरण दिसून आली होती. टॅरिफच्या या धक्क्यातून मगंळवारी बाजार थोडा सावरत असल्याचे दिसून आले. मात्र, बुधवारी बाजाराची सुरुवात होताच पुन्हा एकदा टॅरिफचे आफ्टर शॉक जाणवू लागले असून बाजारात घसरण होत आहे.
ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर 104% आयात शुल्क लादण्याच्या घोषणेनंतर अमेरिकेपासून जपानपर्यंत शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्याचा भारतीय शएअर बाजारावरही बुधवारी परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती. त्या प्रमाणे बुधवारी बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 270 तर निफ्टीमध्ये 150 अंकांची घसरण दिसून आली. अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉरच्या भीतीमुळे अमेरिकन शेअर बाजाराला सोमवारी मोठा दणका बसला. त्याचे आफ्टरशॉक अजूनही सुरूच आहेत. युरोप आणि आशियातील बाजारपेठांमध्येही मोठी घसरण झाली. जपानचा निक्केई 1.51% आणि हाँगकाँगचा फ्युचर्स 3.1% घसरला.
बुधवारी बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स 270 अंकांनी घसरून 73,856 वर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सच्या टॉप लूझर्सच्या यादीत टाटा स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस, सन फार्मा यांसारखे शेअर्स समाविष्ट आहेत. पॉवर ग्रिड, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा यांचा शेअरमध्ये थोडी तेजी दिसत आहे.
शेअर बाजार बुधवारी घसरणीसह उघडला. आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी सेन्सेक्स 74000 च्या वर उघडला. त्यात 123 अंकांची घसरण झाली. तर निफ्टी 50 नेही बुधवारी 22460 च्या पातळीवर 75 अंकांच्या घसरणीसह व्यवहार सुरू केला. त्यानंतर बाजारात घसरण कायम असल्याचे दिसून येत आहे.
घसरणीने बाजाराची सुरुवात झाल्यानंतर 9.30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 440 अंकांनी घसरून 73787 वर पोहोचला आहे. निफ्टी देखील 151 अंकांच्या घसरणीसह 22384 वर व्यवहार करत आहे. बाजारात आज 1852 शेअर्स लाल रंगात व्यवहार करच आहत, तर फक्त 401 शेअरमध्ये किरकोळ वाढ होत आहे. दुपारनंतर जागितक बाजाराचा परिणाम होणार असल्याने घसरण आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List