बीडीडीच्या नवीन घराच्या लॉटरीत गडबड, हायकोर्टाची म्हाडाला चपराक; ना. म. जोशी मार्गावरील चार चाळींची लॉटरी स्थगित

बीडीडीच्या नवीन घराच्या लॉटरीत गडबड, हायकोर्टाची म्हाडाला चपराक; ना. म. जोशी मार्गावरील चार चाळींची लॉटरी स्थगित

बीडीडी चाळीच्या नवीन घरांसाठी स्थानिक रहिवाशांची लॉटरी काढताना म्हाडाने काही इमारतींना झुकते माप दिल्याच्या आरोपाची उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेतली. तसेच ना. म. जोशी मार्गावरील 7, 8, 9 व 10 या चार चाळींच्या लॉटरीला न्यायालयाने स्थगिती दिली. गेल्या वर्षी या चार चाळींची लॉटरी काढण्यात आली होती.

ना. म. जोशी मार्ग बीडीडीतील रहिवाशी वसंत जाधव व अन्य यांनी अॅड. मयूर गोविंद सानप यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. रॅण्डम पद्धतीने नवीन घरांसाठी लॉटरी काढली जाईल, असे म्हाडाने सांगितले होते. तरीही येथील काही इमारतींना लॉटरीत जाणीवपूर्वक वरच्या मजल्यांवर घरे देण्यात आली आहेत. हे म्हाडाच्या धोरणाच्या विरोधात आहे, असे अॅड. संजीव कदम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आम्ही टप्प्याटप्प्याने येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करत आहोत. त्यातूनही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. त्यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती म्हाडाचे वकील प्रसाद लाड यांनी केली.

लॉटरी काढताना समानता ठेवली गेली नाही

आपण खाजगी बिल्डर नाही हे आधी म्हाडाने विसरू नये. पुनर्विकास नेमका कसा चालला आहे याबाबतच साशंकता आहे. काहींना ठरवून वरच्या मजल्यावर घरे दिली गेली आहेत. याचा अर्थ लॉटरीत समानता ठेवली गेली नाही, असे ताशेरे न्यायालयाने म्हाडावर ओढले.

काही रहिवाशांना 17 ते 22 मजल्यावर जाणीवपूर्वक घरे दिली

ना. म. जोशी मार्गावर एकूण 32 बीडीडी चाळी आहेत. पहिल्या टप्प्यात 16 इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. यासाठी 11 फेब्रुवारी 2021 रोजी 3, 4, 5, 6, 11 व 12 या चाळींतील रहिवाशांची नवीन घरासाठी लॉटरी काढण्यात आली. यांना 17 ते 22 मजल्यांवर पुनर्विकासात नवीन घरे मिळणार आहेत. त्यानंतर 26 ऑक्टोबर 2021 रोजी 13, 14, 15 व 30 या इमारतीतील रहिवाशांची लॉटरी काढण्यात आली. 29 सप्टेंबर 2022 रोजी 1 व 2 दोन या इमारतीतील रहिवाशांची लॉटरी काढण्यात आली. 7, 8, 9 व 10 इमारतींना या लॉटरीबाबत काहीच सांगण्यात आले नाही. 3 मे 2024 रोजी या चार इमारतींची लॉटरी काढण्यात आली. या  लॉटरी काढताना म्हाडाने स्वतःच्याच नियमांचे पालन केलेले नाही. 3 मे 2024 रोजी काढलेली लॉटरी स्थगित करावी. त्याआधी काढलेल्या सर्व लॉटरी रद्द करून नव्याने 16 इमारतींतील रहिवाशांची एकत्रित व नियमाने लॉटरी काढावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? दागिन्यांसह दिला होता अग्नी लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? दागिन्यांसह दिला होता अग्नी
मराठी चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेते म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे ओळखले जातात. त्यांच्या सिनेमांसोबतच खासगी आयुष्याची कायम चर्चा झाली. लक्ष्मीकांत बर्डे यांच्या पत्नीचे...
सीरिजमध्ये असे काही सीन जे करताना अभिनेत्रीची वाईट अवस्था, म्हणाली “मी कधीही विसरू शकणार नाही..”
रणबीर कपूर राहाला झोपवताना म्हणतो हे खास गाणं; आलियाने सांगितला भन्नाट किस्सा 
धार्मिक विधीदरम्यान निखाऱ्यांनी भरलेल्या खड्ड्यात पडून भाविकाचा मृत्यू, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
चंद्रपुरात रुग्णवाहिका, शववाहिका व पाणी टँकर यांच्या दरात वाढ; नोटा उधळत पालिकेसमोर आंदोलन
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
Jalna News – चौथीही मुलगीच झाली, नातेवाईकांनी त्रास दिला; माता-पित्यांनी विहिरीत टाकून चिमुकलीला संपवलं