Kunal Kamra Controversy – काट डालेंगे तुम्हें! ‘गद्दार’ गीताने मिंधेंना चोपणाऱ्या कुणाल कामराला 500 हून अधिक धमकीचे फोन
स्टँड अप कॉमेडियन कुमाल कामरा याने ‘गद्दार’ गीतामधून मिंधेंना झोडपून काढले. हे ‘गद्दार’ गीत झोंपल्याने मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी खार येथील ‘हॅबिटेट’ स्टुडिओत धुडगूस घातला आणि तोडफोड केली. आता त्याला जिवे मारण्याच्या धमक्याही दिले जात आहेत. कुमाल कामराला 500 हून अधिक धमकीचे फोन आल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
मिंधेंवर ‘गद्दार’ गीत केल्यापासून कुणाल कामराला धमकीचे फोन केले जात आहेत. त्याला तुकडे-तुकडे करण्याची धमकी मिळत आहे. यादरम्यान एका फोन कॉलचा ऑडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात कुमाल आपण तामीळनाडूमध्ये असल्याचे सांगत असून फोन करणारा व्यक्ती तामीळनाडूमध्ये कैसे आयेंगे भाई, असे म्हणताना ऐकू येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List