मस्क यांनी गमावले 116 अब्ज डॉलर्स, टेस्लाचे शेअर्स घसरल्याने बसला जबर फटका
अमेरिकेचे उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या टॉप 5 यादीत असलेले एलॉन मस्क यांच्यासाठी 2025 हे वर्ष धोक्याचे असल्याचे दिसत आहे. या वर्षातील अवघ्या तीन महिन्यांत मस्क यांच्या संपत्तीत तब्बल 116 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. मस्क यांची पंपनी टेस्लाचे शेअर्स लागोपाठ घसरत असल्याने त्यांच्या संपत्तीत कमालीची घसरण होत आहे. शेअर्समध्ये सातत्याने घसरण आणि 116 अब्ज डॉलर्सची घसरण झाल्यामुळे मस्क हे सर्वात जास्त नेटवर्थ गमावणारे अब्जाधीश बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्याकडे आता केवळ 316 अब्ज डॉलर्सची नेटवर्थ उरली आहे. संपत्तीत इतकी मोठी घसरण होऊनसुद्धा एलॉन मस्क हे जगातील सर्वात अब्जाधीश बिझनेसमॅनच्या यादीत टॉपवर आहेत. पुढील दोन वर्षांत म्हणजेच 2027 पर्यंत मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनर बनतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बेसोज आणि झुकरबर्ग यांनाही झटका
एलॉन मस्क यांच्या संपत्तीत 116 बिलियन डॉलर्सची घसरण झाल्यामुळे आता त्यांच्याकडे 316 बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. जगातील सर्वात श्रीमंतात दुसऱया नंबरवर जेफ बेजोस आहेत. त्यांच्याकडे एपूण संपत्ती 212 बिलियन डॉलर्स आहे. बेजोस यांनाही गेल्या तीन महिन्यांत फटका बसला असून त्यांनी 27.01 बिलियन डॉलर्सची संपत्ती गमावली आहे. तिसऱया नंबरवर मार्प झुकरबर्ग आहेत. त्यांनाही गेल्या तीन महिन्यांत 3.35 बिलियन डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले आहे. यामुळे त्यांच्याकडे एपूण संपत्ती 204 बिलियन डॉलर्स इतकी राहिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List