धार्मिक द्वेष पसरवण्याचा आधारावर प्रथम भाजपची मान्यता रद्द झाली पाहिजे, संजय राऊत यांचा घणाघात
धार्मिक द्वेष पसरवण्याचा आधारावर कुठल्या पक्षाची मान्यता रद्द होणार असेल तर प्रथम भाजपची मान्यता रद्द झाली पाहिजे, घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी कुणालाही इथून चालते व्हा असे म्हणाले नाही, इथे राहणार असाल तर मराठीत बोलावं लागेल अशी बाळासाहेबांची भूमिका होती असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, धार्मिक द्वेष हाच जर विषय असेल तर सर्वात आधी भारतीय जनता पक्षाची मान्यता रद्द व्हायला पाहिजे. या देशात धार्मिक द्वेष, धर्मांधता पसरवण्याचं जर काम कोणी करत असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. भाजपचे प्रचारक धीरेंद्र शास्त्री म्हणून एक बुवा आहेत.ते म्हणतात अशी अनेक गाव आहेत तिथे एकही मुसलमानाने राहता कामा नये, फक्त हिंदूंनी राहावं अशा प्रकारची भाषा या देशात करणारे आहेत. आणि नरेंद्र मोदी त्यांच्या दर्शनाला मुद्दाम जातात. म्हणजे नरेंद्र मोदींची त्या शास्त्री बुवाच्या म्हणण्याला मान्यता आहे. मग धार्मिक द्वेष पसरवला जातोय म्हणून पक्षाची मान्यता रद्द होणार असेल तर सुरुवात भारतीय जनता पक्षापासून केली पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.
तसेच माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कुणालाही इथून चालते व्हा सांगितलं नाही. पण तुम्हाला मराठी शिकावं लागेल, मराठी बोलावं लागेल ही बाळासाहेबांची भूमिका होती असे संजय राऊत म्हणाले. जर कोणी मराठी शिकत असेल आणि मराठी शिकवण्याची जबाबदारी कोणावरती आली असेल तर त्याच्यामध्ये काय चुकीचं असं मला वाटत नाही. हैदराबादला असंख्य मराठी लोक राहतात आणि तेलगू बोलतात. केरळमध्ये असंख्य मराठी लोक राहतायत त्यांना उत्तम मल्याळम येतं. लखनऊ, दिल्लीत राहणाऱ्या आमच्या लोकांना उत्तम हिंदी येतं. ज्या राज्यात राहता त्या राज्याची भाषा यायलाच पाहिजे आणि ती जर कोणाला शिकण्याची इच्छा असेल आणि शिकून ते मराठीची सेवा करणार असतील महाराष्ट्राची तर त्या चुकलं काय? असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List