ट्रम्प तिथे भारताला धू धू धुतोय आणि हे विष्णूचे अवतार गप्प आहेत, टॅरिफ युद्धावरून संजय राऊत यांनी फटाकरले
नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत का? ट्रम्प तिथे भारताला धू धू धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच भाजप नेत्यांच्या कानाचे ऑपरेशन्स केले पाहिजे आणि यांच्या मेंदूला जो कचरा साचलेला आहे तो साफ केला पाहिजे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, सहदेव हे सुद्धा एक महाभारतातलं पात्र आहे. जे पांडव होते त्यांच्यामध्ये एक सहदेव होते आणि संजय आहेच. यांच्या कानाचे ऑपरेशन्स केले पाहिजे आणि यांच्या मेंदूला जो कचरा साचलेला आहे तो साफ केला पाहिजे. आम्ही कधी माननीय बाळासाहेबांची देवाशी तुलना केली नाही, कारण बाळासाहेबांना आवडत नव्हतं. यांना बाळासाहेब ठाकरे कळले नाही, हिंदुदयसम्राट, वीर सावरकर कळले नाहीत, यांना उद्धव ठाकरे कळाले नाहीत. यांना फक्त चमचेगिरी आणि बूट चाटेगिरी कळते. नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत का? ट्रम्प तिथे भारताला धू धू धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. अख्ख जग ट्रम्पच्या विरोधामध्ये आहे. आणि फक्त एकच देश तोंडामध्ये बोळा घालून बसलाय तो म्हणजे आपला भारत देश. भारत देशाचे पंतप्रधान देव आहेत ना विष्णूचे अवतार? मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवानं ट्रम्प वर. सत्तेवरती बसलेत त्याच्यामुळे भोंगे सुटले आहेत असे संजय राऊत म्हणाले.
जागतिक क्रिकेटचा उद्धार आता भारतालाच करावा लागतोय. नियतीने ही जबाबदारी भारतावर सोपवली आहे. एका बाजूला जय शहा ज्याने 100 सेंचुऱ्या मारल्या, ज्याने गावस्कर, सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवलं. ज्याने शे दिडशे विकेट्स घेतले, ज्याने 100, 200 कॅचेस पकडल्या, असे महान जयशहा भारतीय क्रिकेटचे सूत्रधार आहेत. दुबईला इस्लामी राष्ट्रात बसतात भारतात नाही. पाकिस्तानचे क्रिकेटपटू मोसी नकवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री हातात हात घालून काम करणार. हे जर दुसरं कोणी असतं तर हिंदुत्व, राष्ट्रवाद धोक्यात आला असता आणि भारतीय जनता पक्षाने छाती बडवली असती. कोणी शिवसेनेचा असता किंवा काँग्रेसचा असता या मंत्र्यांच्या जागी तर अक्षरशः गोंधळ घातला असता. पण आता भारताच्या क्रिकेटच्या उद्धारासाठी महाराष्ट्रातले भाजपचे एक मंत्री पाकिस्तानचे क्रिकेटपटू त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले, त्यांच्या हाताखाली काम करणार आणि अशा तऱ्हेने पाकिस्तान आणि महाराष्ट्राचे मंत्री भाजपचे ते हातात हात घालून गुण्या गोविंदान नांदणार आणि लोकांनी इथे मारामाऱ्या करायच्या, मशिदी झाकून ठेवायच्या, मुसलमानांची मटणांची वेगळी दुकानं करायला लावावायची. लोकांना मूर्ख बनवायचे धंदे जरा बंद करा. दुसरं कोणी असतं तर राजीनामा द्यायला लावला असता. महाराष्ट्रातून किवा देशातून दुसरा कोणी एखादा सदस्य त्या मोहसीन नकवीच्या हाताखाली काम करणारा असता तर त्यांनी राजीनामा द्यायला लावला असता. माझ्या माहितीप्रमाणे त्या समितीवरती राजीव शुक्ला सुद्धा आहेत. आणि जर कोणी भाजपचा नसता तर राजीव शुक्ला राजीनामा दो आप पाकिस्तान के साथ क्या कर रहे हो असा प्रश्न विचारला असता असे संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेबांनी जावेद मियादला बोलावलं नव्हतं तुम्ही अभ्यास करून बोला, माहिती घेऊन बोला. जावेद मियाँदाद दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आला होता. जावेद मियाँदाद दिलीप वेंगसरकर बरोबर आहे याची मातोश्रीला कल्पना नव्हती. भारतीय क्रिकेटचे कर्णधार दिलीप वेंगसरकर त्यांना वेळ दिली त्यांच्याबरोबर जावेद मियाँदाद होते. जावेद मियादाँद तिथे आल्यावर बाळासाहेबांनी पाहुणचार केला आणि जाताना सुनावलं पाकिस्तानची वकिली इथे करायची नाही. जोपर्यंत पाकिस्तान कश्मीरमध्ये आणि देशभरामध्ये आतंकवाद अतिरेक घडवून आमच्या सैनिकांचे आणि जनतेचे बळी घेते तोपर्यंत पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू देणार नाही हे ठणकवून सांगण्याची हिंम्मत माननीय हिंदुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होती. आता पाकिस्तान बरोबर हात मिळवणी करून क्रिकेटचा उद्धार करतात हे लोक. आज पाकिस्तानच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसण्याच शौर्य आणि प्रखर राष्ट्रवाद महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने दाखवल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंनी आशिष शेलार यांचा वीर सावरकर सभागृहात, संघाच्या मुख्यालयात जय शहांच्या हस्ते सत्कार केला पाहिजे असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List