अमेरिकेत व्हिसासाठी नवा कायदा येतोय, 3 लाख हिंदुस्थानी विद्यार्थी चिंतेत

अमेरिकेत व्हिसासाठी नवा कायदा येतोय, 3 लाख हिंदुस्थानी विद्यार्थी चिंतेत

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या लाखो हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. अमेरिकेच्या संसदेत एक नवीन व्हिसा विधेयक सादर करण्यात आले आहे. हे विधेयक जर संसदेत मंजूर झाले तर अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या जवळपास 3 लाखा हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर काम करता येणार नाही. याला ऑप्शन प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजेच ओपीटी असे म्हणतात. हा नियम लागू झाल्यानंतर अमेरिकेतील हजारो हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना तत्काळ अमेरिका सोडणे भाग पडेल. यामुळे त्यांच्या करीअरवर पाणी फिरेल. तसेच शिक्षणासाठी घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहील. अमेरिकेतील नव्या विधेयकामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता पसरली आहे. या विधेयकाद्वारे थेट मागणी करण्यात आली आहे की, दुसऱया देशांतील जे विद्यार्थी शिक्षणानंतर 1 ते 3 वर्षांपर्यंत अमेरिकेत काम करू शकतात ते काम विद्यार्थ्यांना करता येणार नाही.

शिक्षण आणि नोकरीवर परिणाम

2023-24 च्या शैक्षणिक सत्रात अमेरिकेत सर्वात जास्त हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संख्या आहे. ही संख्या 3.3 लाखांहून अधिक असून यातील 97,556 विद्यार्थ्यांनी ओपीटीचा लाभ घेतला आहे. परंतु अमेरिकेतील संसदेत मांडण्यात आलेल्या विधेयकाला मंजुरी मिळाली तर या विद्यार्थ्यांना अमेरिकेत काम करता येणार नाही. या कायद्यानुसार, सर्वात मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी मोठे कर्ज घेतले आहे ते कर्ज विद्यार्थी अमेरिकेत नोकरी करून फेडायचे. त्यांना आता थेट मायदेशी परतावे लागेल. त्यामुळे शिक्षणासाठी कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

विदेशात 91 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर हिंसक हल्ले

परदेशात शिक्षण घेणाऱया हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर होणाऱया हिंसक हल्ल्यांच्या वाढत्या संख्येबद्दल अलीकडेच सरकारने लोकसभेत माहिती दिली. या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत 12 देशांमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर 91 हिंसक हल्ले झाले आहेत, ज्यात 30 जणांचा मृत्यू झाला. पॅनडामध्ये सर्वाधिक हिंसक हल्ल्यांची नोंद झाली असून
27 घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशनिहाय हल्ले

– कॅनडा – 27 हल्ले, 16 मृत्यू
– अमेरिका – 9 हल्ले, 9 मृत्यू
– यूके – 12 हल्ले, 1 मृत्यू
– ऑस्ट्रेलिया – 4 हल्ले, 1 मृत्यू
– जर्मनी – 11 हल्ले, 1 मृत्यू
– चीन – 1 हल्ला, 1 मृत्यू
– किर्गिस्तान – 1 हल्ला, 1 मृत्यू
– फिलिपिन्स – 3 हल्ले
– आयर्लंड – 4 हल्ले
– रशिया – 15 हल्ले
– इटली – 3 हल्ले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – वानखेडेवर मुंबईच्या शिलेदारांचाच दबदबा, हैदराबादला 4 विकेटने नमवलं IPL 2025 – वानखेडेवर मुंबईच्या शिलेदारांचाच दबदबा, हैदराबादला 4 विकेटने नमवलं
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध (MI) सनरायझर्स हैदराबाद (SRH) सामन्यात मुंबईने हैदराबादचा अगदी सहज पराभव केला. हैदराबादने दिलेले 163...
‘बाळासाहेब असते तर यांना चाबकानं फटकारलं असतं’, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल
शाळेत ‘हिंदी’ची सक्ती, ‘जर राज ठाकरेंनी विरोध केला तर आम्ही…’, सदावर्तेंंचा थेट इशारा
मुंबईत सोने खरेदी करणाऱ्यांची निराशा, दराने गाठला नवा उच्चांक, प्रतितोळा भाव…
“ट्रेलर पाहून अंदाज लावू नका, चित्रपट पाहा”, ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
सैफ अली खानचा लेक साराच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; किसिंग सीन्सची चर्चा
…मुलांची शाळेत येण्याची इच्छा मारली जातेय; हिंदी सक्तीवर मराठी अभ्यासकांची प्रतिक्रिया