पाकिस्तानी मोहसीन नक्वीच्या नेतृत्वात आशीष शेलारांची बॅटिंग, राष्ट्रभक्तीचे ढोंग करणारा भाजप क्लीन बोल्ड
‘एक है तो सेफ है…’, ‘हिंदू खतरे में है…’ अशी जोरदार बांग देत सत्ता बळकावणाऱया आणि पदोपदी पाकिस्तानला धडा शिकवण्याची टिमकी मिरवणाऱया भाजपने आता तर हद्दच केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार आता चक्क पाकिस्तानी राजकीय नेते मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्वाखाली आशिया क्रिकेट काwन्सिलमध्ये ‘बॅटिंग’ करताना दिसणार आहेत. यामुळे नेहमीच बेगडी राष्ट्रभक्तीचे ढोंग करणारी भाजप क्लीन बोल्ड झाली आहे.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांची नुकतीच ‘आशिया क्रिकेट काwन्सिल’च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकतीच श्रीलंकेच्या शम्मी सिल्वा यांच्याकडून औपचारीकपणे कारभाराची सूत्रे हाती घेतली आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) माजी खजिनदार आणि राज्यातील विद्यमान मंत्री आशीष शेलार यांची आशिया क्रिकेट काwन्सिलच्या सदस्यपदी निवड झाली आहे. शेलार यांच्या नियुक्तीमुळे ते पाकिस्तानी नक्वींच्या हातात हात घालून काम कसे करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय हिंदुत्वाचे पैवारी असल्याचा आव आणणारी भाजप पाकिस्तानी मुस्लीम नक्वींच्या हाताखाली काम कसे करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात असून भाजप आता मूग गिळून का गप्प बसली आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
…आता कसे तोंड देणार?
जागतिक क्रिकेटचे हृदय राहिलेल्या आशिया खंडात क्रिकेटला आणखी उंचीवर नेण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे नक्वी म्हणाले आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाने मुस्लीम बांधवांची बाजू घेतल्यास, त्यांच्या हक्कांबद्दल बोलल्यास आणि मुस्लीम नेत्यांची भेट घेतल्यास आकांडतांडव करणारी, थयथयाट करणारी भाजप आता देशातील इतर पक्षांना कसे तोंड देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
असे आहे भाजपचे बेगडी हिंदुत्व!
– 2019च्या निवडणुकीआधी पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावावर मते मागितली होती.
– बिहार विधानसभा निवडणुकीआधी जेडीयूचे नितीशकुमार जिंकल्यास पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील, असा प्रचार सुरू असताना आता भाजप दोन टर्म नितीशकुमारांसोबत सत्तेत आहे.
– एकीकडे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हिंदुस्थानचे जवान शहीद होत असताना 2023मध्ये पाकिस्तान वर्ल्डकपच्या निमित्ताने हिंदुस्थानमध्ये आला असताना त्यांच्यावर फुले उधळण्यात आली होती.
– कोणत्याही पक्षाने मुस्लीम बांधवांची बाजू घेतल्यास, त्यांच्या हक्कांबद्दल बोलल्यास आणि मुस्लीम नेत्यांची भेट घेतल्यास आकांडतांडव करणारी, थयथयाट करणारी भाजप आता देशातील इतर पक्षांना कसे तोंड देणार?
भाजपचा बेगडी मुखवटा गळाला
विरोधी पक्षांचे सरकार सत्तेत असताना पाकिस्तानी खेळाडू, कलाकारांना हिंदुस्थानात पाय ठेवू देणार नाही, अशा वल्गना करणाऱया भाजपचा बेगडी मुखवटा या प्रकारामुळे गळून पडला आहे. यामुळे आता भाजप स्वतःला हिंदूंचे पैवारी कसे म्हणवून घेणार, असा सवालही राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
भाजप एरव्ही पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडत असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी पाकिस्तानमध्ये डिसेंबर 2016मध्ये पोहोचले होते.
आयसीसीचे अध्यक्ष जय शहा, तत्कालीन पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्वी, भाजपचे अनुराग ठाकूर आणि इतरांनी हिंदुस्थान-पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीचा सामना एकत्र बसून पाहिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List