रत्नागिरी पोलीसांची धडक कारवाई, ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि साडेपाच किलो गांजा जप्त

रत्नागिरी पोलीसांची धडक कारवाई, ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि साडेपाच किलो गांजा जप्त

अंमली पदार्थांचा रत्नागिरी जिल्ह्याला विळखा पडला आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत रत्नागिरी पोलीसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. नाचणेरोड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या जप्त केल्या. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कोकणनगर ते प्रशांतनगर दरम्यान 5 किलो 55 ग्रॅम वजनाचा गांजा पकडला.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी अंमली पदार्थाच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस दलाला दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांचे पथक गस्त घालत असताना नाचणे रस्ता ते गुरुमळी दरम्यान आडोशाला एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसून आली. चौकशी केली असताना त्या व्यक्तीचे नाव अदनान नाजीममियाँ नाखवा, वय 25 असे त्याने सांगितले. त्याच्या ताब्यातील पिशवी तपासली असता त्यामध्ये ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि इतर साहित्य सापडले. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर आणि गणेश सावंत यांनी केली.

शहर पोलीसांकडून 5.55 किलो गांजा जप्त

उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा शोध सुरु केला होता. पोलीस उपनिरीक्षक शाम आरमाळकर हे कोकणनगर ते प्रशांतनगर दरम्यान गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळली. पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो सांगली येथून गांजा घेऊन रत्नागिरीत आला होता. मन्सूरअली निजाम पठाण, वय 40, रा. मिरज-सांगली असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे 5 किलो 55.5 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलीसांनी एकूण 3 लाख 25 हजार 500 रुपयांचा मुददेमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर, उपनिरीक्षक शाम आरमाळकर, दीपक साळवी, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर, अमोल भोसले, आशिष भालेकर, कौस्तुभ जाधव, अमित पालवे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तर संघर्ष अटळ, अभ्यासक्रमात ‘हिंदी’च्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, दिला थेट इशारा …तर संघर्ष अटळ, अभ्यासक्रमात ‘हिंदी’च्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, दिला थेट इशारा
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा...
VIDEO: अवॉर्ड शोमध्ये करीना कपूरचा उद्धटपणा; ऐश्वर्याच्या हातातून माइक हिसकावला,ऐश्वर्याच्या कृतीने जिंकले मन
उपासमारीने त्रस्त शाहरुख खानची ऑनस्क्रिन आजी, रुग्णालयात सोडून गेला मुलगा, 91 व्या वर्षी वेदनादायक अंत
‘घटस्फोट लवकरच होईल’ म्हणणाऱ्यावर भडकली सोनाक्षी सिन्हा; थेट म्हणाली ‘तुझे आईवडील..’
साक्षात परब्रम्हाला कोणता वैद्य बरा करणार? ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत मोठा ट्विस्ट
छोट्या शेफ ‘राहा’ ने आई आलिया भट्टसाठी बनवलं 7 कोर्स जेवण, पोस्ट पाहून चाहते म्हणाले, खूपच छान
‘त्याच्या डोळ्यात बोचत राहू, धाय मोकलून रडेल तो..’; ट्रोलिंगबद्दल सलील कुलकर्णी यांची मार्मिक कविता