शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांसमोर वाचला कळवा, मुंब्रा, दिव्यातील समस्यांचा पाढा; बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई, वाहतूककोंडी, वाढते प्रदूषण

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांसमोर वाचला कळवा, मुंब्रा, दिव्यातील समस्यांचा पाढा; बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई, वाहतूककोंडी, वाढते प्रदूषण

बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई, वाहतूककोंडी आणि वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यात कलवा, मुंब्रा तसेच दिव्यातील नागरिक सापडले आहेत. या मूलभूत समस्यांकडे ठाणे महापालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीत असलेल्या कळवा, मुंब्रा आणि दिव्याला महापालिका सपत्नीक वागणूक देत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर विविध समस्यांचा पाढाच वाचला. दरम्यान या मूलभूत समस्या तत्काळ सोडवण्यात याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने आयुक्ताकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवा, कळवा व मुंब्रा शहरांची अक्षरशः बजबजपुरी झाली आहे. सत्ताधारी व काही अधिकाऱ्यांच्या ‘मिलीजुली’ने दिव्यात वेगाने अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अवघ्या तीन महिन्यांत चार मजल्यांच्या इमारती उभारल्या जात असून अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने दिव्यातील नागरिकांना अंधारात ढकलण्याचे काम बिल्डरांकडून केले जात असल्याचा आरोप यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच सद्यस्थितीत दिवा शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. आगामी 20 वर्षांत शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने दिवा शहरात नवीन जागा शोधून स्वतंत्र प्लाण्ट उभारावा व नवीन जलपुरवठा योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, महिला जिल्हा संघटक वैशाली राणे – दरेकर, युवा शहर अधिकारी प्रतीक पाटील, माजी नगरसेविका अंकिता पाटील, शहरप्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, महिला शहर संघटक ज्योती पाटील, उपशहरप्रमुख तेजस पोरजी, अभिषेक ठाकूर, लहू चाळके, विजय कदम आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बाळासाहेब असते तर यांना चाबकानं फटकारलं असतं’, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल ‘बाळासाहेब असते तर यांना चाबकानं फटकारलं असतं’, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला...
शाळेत ‘हिंदी’ची सक्ती, ‘जर राज ठाकरेंनी विरोध केला तर आम्ही…’, सदावर्तेंंचा थेट इशारा
मुंबईत सोने खरेदी करणाऱ्यांची निराशा, दराने गाठला नवा उच्चांक, प्रतितोळा भाव…
“ट्रेलर पाहून अंदाज लावू नका, चित्रपट पाहा”, ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
सैफ अली खानचा लेक साराच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; किसिंग सीन्सची चर्चा
…मुलांची शाळेत येण्याची इच्छा मारली जातेय; हिंदी सक्तीवर मराठी अभ्यासकांची प्रतिक्रिया
Ratnagiri News – सेल्फी काढण्यासाठी खडकावर उभा होता, तोल जाऊन समुद्रात पडला अन् बुडाला