‘स्नो व्हाईट’ने यूकेमध्ये वाढवले प्रदूषण
गेल्या महिन्यात लंडनमध्ये प्रदर्शित झालेला ‘स्नो व्हाईट’ चित्रपट निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देत असला तरी वास्तविक जीवनात चित्रपटाने विपरित काम केले आहे. ‘स्नो व्हाईट’च्या निर्मितीमुळे युकेमध्ये प्रदूषणात भर पडली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत जास्त प्रमाणात कार्बनचे (ग्रीनहाऊस वायू) उत्सर्जन झाले. ‘स्नो व्हाइट’ आणि ‘द लिटिल मरमेड’चे एकत्रित कार्बन उत्सर्जन बार्ंमगहॅम आणि ल्युटन विमानतळांनी तयार केलेल्या वार्षिक उत्सर्जन प्रमाणापेक्षा जास्त आढळून आलंय. वॉल्ट डिस्ने पंपनीच्या कागदपत्रांवरून असे दिसून येतंय की, ‘स्नो व्हाईट’ आणि ‘द लिटिल मरमेड’ या दोन चित्रपटांनी यूकेमध्ये बनवलेल्या त्यांच्या इतर कोणत्याही चित्रपटांपेक्षा जास्त प्रदूषण निर्माण केले. प्रदूषणाच्याबाबतीत तर ‘स्नो व्हाईट’ ने ‘फास्ट अँड फ्युरियस’ लाही मागे टाकले आहे. खरं तर ‘द लिटिल मरमेड’चे शूटिंग सार्डिनिया येथेही झालेले आहे. तर ‘फास्ट अँड फ्युरियस’ चित्रपट निर्मात्यांनी इटली आणि अमेरिकेत प्रवास केला होता. त्यामुळे जागतिक पातळीचा विचार केला तर एपूण कार्बन उत्सर्जन जास्त असू शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List