तहव्वुर राणाला हिंदुस्थानात आणल्यावर NIA न्यायालयात हजर करणार; मुख्यालयाची सुरक्षा वाढवली
2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला हिंदुस्थानात आणण्यात येत आहे. अमेरिकी न्यायालयाने प्रर्त्यापणाची परवानगी दिल्यानंतर त्याला विशेष विमानाने हिंदुस्थाना0त आणले जात आहे. हे विमान बुदवारी संध्याकाळी किंवा गुरुवारी सकाळी हिंदुस्थानात पोहोचणार आहे. त्यानंतर त्याला लगेचच NIA च्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे दिल्लीतील एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीआयएसएफने अतिरिक्त बॅरिकेडिंग लावले आहे. तहव्वुर राणासोबत तपास संस्थांचे एक पथकही आहे. याआधी, अमेरिकेत प्रत्यार्पणाच्या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.
राणाविरुद्ध दिल्लीत एनआय गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला प्रथम थेट दिल्लीला आणले जाईल. येथे त्याला दिल्लीतील एनआयए न्यायालयात हजर केले जाईल, जिथे त्याची कोठडी मागितली जाईल. यानंतर मुंबई गुन्हे शाखा त्याला ताब्यात घेईल. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यानंतर त्याला विशेष विमानाने हिंदुस्थानात आणले जात आहे. अमेरिकन न्यायालयाच्या सूचनेनुसार, तहव्वुर राणाला दिल्ली किंवा मुंबई तुरुंगात गुप्तपणे ठेवले जाईल. या काळात त्यांच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवतील.
2006 ते नोव्हेंबर 2008 पर्यंत तहव्वुर राणाने डेव्हिड हेडली आणि पाकिस्तानमधील इतरांसोबत कट रचला. या काळात तहव्वुर राणाने लष्कर-ए-तैयबा आणि हरकत उल जिहाद ए इस्लामी या दहशतवादी संघटनांना मदत केली आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना आखली आणि ती राबवण्यास मदत केली. या प्रकरणात दहशतवादी हेडली सरकारी साक्षीदार बनला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List