भगवती रुग्णालयाचे खासगीकरण नको, अंबादास दानवेंनी घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट
रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या बोरिवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयाचे खासगीकरन न करता रुग्णालय पालिकेतर्फे अद्यावत आणि सुसज्ज करण्यात यावे, या मागणीसाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
भगवती रुग्णालयाचे खासगीकरण न करता पालिकेतर्फेच अद्यावत आणि सुसज्ज असे 9 मजल्यांचे 490 खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्त… pic.twitter.com/JGCWLVMgVE
— Ambadas Danve (@iambadasdanve) April 8, 2025
पश्चिम उपनगर ते पालघर, सफाळ्यापर्यंतच्या रुग्णांसाठी भगवती रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे त्याचे खाजगीकरन न करता पालिकेतर्फे अद्यावत आणि सुसज्ज असे 9 मजल्यांचे 490 खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच त्याचे निवेदन अंबादास दानवे यांच्या नेत्वृत्वाखाली शिवेसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहे. यावेळी शिवसेना आमदार सुनील प्रभू, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार सचिन अहिर, आमदार ज. गो. अभ्यंकर, आमदार हारून खान, आमदार महेश सावंत, आमदार मनोज जामसुतकर, आमदार बाळा नर, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी आमदार विनोद घोसाळकर, माजी आ. विलास पोतनीस, माजी महापौर श्रद्धा जाधव, काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष संदेश कोंडविलकर, विभागप्रमुख माजी नगरसेवक उदेश पाटेकर, माजी नगरसेविका संजना घाडी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List