‘त्या’ नराधमाने प्रेयसीच्या दुसऱ्या मुलीवरही केलेले लैंगिक अत्याचार
जालन्यात प्रेयसीच्या सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराबरोबरच अनैसर्गिक कृत्ये केल्याप्रकरणी पोलीस कोठडीची असलेला प्रशांत प्रकाश वाडेकर याचा आणखी एक संतापजनक कारनामा उघडकीस आला आहे.
या नराधमाने पीडित मुलीच्या चार वर्षाच्या लहान बहिणीवरदेखील लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्याने आज 8 एप्रिल रोजी पुन्हा त्याच्यावर प्रेयसीने दिलेल्या फिर्यादीवरून आणखी एक गुन्हा कदीम जालना पोलिसांनी दाखल केला आहे. पतीपासून विभक्त असलेली जिंतूर तालुक्यातील 28 वर्षीय महिला आपल्या 6 आणि 4 वर्षीय दोन मुली व तिचा प्रियकर प्रशांत प्रकाश वाडेकर यांच्यासोबत भाड्याच्या खोलीत राहत होती.
प्रेयसीच्या सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक कृत्ये केल्याप्रकरणी प्रशांत प्रकाश वाडेकर याच्याविरुद्ध कदीम जालना पोलिसांनी 6 एप्रिल रोजी लैंगिक अत्याचार आणि पोस्को कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचदिवशी रात्री प्रशांत वाडेकर यास कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, किशोर वनवे यांनी ताब्यात घेऊन अटक केली होती.
अटकेत असलेल्या प्रशांत वाडेकर याची न्यायालयाने 10 एप्रिल पर्यंतच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, कोठडीतील चौकशीदरम्यान नराधम प्रशांत वाडेकर याने 6 वर्षीय मुलीसोबतच 4 वर्षीय मुलीवरही लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.
त्यामुळे आज पुन्हा पीडित मुलींच्या आईच्या फिर्यादीवरून प्रशांत प्रकाश वाडेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 64(2)(एफ), 65(2) आणि पोक्सो कायद्याच्या 4,6,8 कलमान्वये कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पिंक मोबाईल पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे हे पुढील तपास करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List