नवीन सरकार स्थापन होताच वक्फ विधेयक रद्द करू, ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य
वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर मंजूर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जेव्हा भाजप केंद्रातील सत्तेतून पायउतार होईल, तेव्हा हे वक्फ विधेयक रद्द केले जाईल.” त्यांनी भाजपवर वक्फ विधेयकाद्वारे देशाचे विभाजन करण्याचा आरोप केला आहे.
भाजपवर हल्लाबोल करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “भाजपने देशाचे विभाजन करण्यासाठी वक्फ दुरुस्ती विधेयक आणले आहे. जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार जाईल आणि नवीन सरकार स्थापन होईल, तेव्हा वक्फ विधेयक रद्द केले जाईल.” दरम्यान, लोकसभेत तृणमूल काँग्रेसने विधेयकाच्या विरोधात मतदान केले. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक हे राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचे म्हटले. संसदेला या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही, असा दावाही त्यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List